सुबोध भावे झळकणार बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यासोबत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपट सुष्टीमधील अनेक कलाकारांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटात देखील आपले नाव चांगलेच कमावले आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपटातील कलाकारांनी देखील मराठी चित्रपटात धमाकेदार एन्ट्री केली आहे. यामध्ये अनेक कलाकार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे ज्याने त्याच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेतूल चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्याच्या चाहत्यांना आता आनंदाची बातमी मिळणार आहे.

अभिनेता सुबोध लवकरच एका चित्रपटामधून प्रसिद्धअभिनेत्यासोबत झळकणार आहे. या अभिनेत्यासोबत प्रत्येकजण काम करण्यास उत्सुक असतात. हा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन ज्याने चित्रपट सृष्टीत मोलाचे काम केले आहे. लाखो चाहत्यांनी त्याला भरभरुन प्रेम दिले आहे. अमिताभ बच्चनचा आगामी चित्रपट ‘एबी आणि सीडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमिताभसोबत मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, आणि सुबोध भावे दिसणार आहे.

View this post on Instagram

निर्विवाद पणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत.त्यांच्या बरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. माझंही होतं आणि माझ्या मातृभाषेतील,मिलिंद लेले दिग्दर्शित " AB आणि CD" चित्रपटात ते साकार झालं. कलाकारांनी कसं असावं कसं वागावं कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीम चे मनपूर्वक आभार. @planet.marathi #ABaaniCD

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

या चित्रपटाच्या शुटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. सुबोध भावेने अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे. सुबोध म्हणाला की, ‘ अमिताभ हे निर्विवादपणे अभिनयाचे शहेनशहा आहेत. त्यांच्याबरोबर काम करावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझेही होते आणि माझ्या मातृभाषेतील मिलिंद लेले, दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ चित्रपटात ते साकार झाले. कलाकारांनी कसे असावे, कसे वागावे कसे रहावे आणि कसे काम करावे याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टिमचे मनपूर्वक आभार.’

View this post on Instagram

Correct caption sanga

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे आदी कलाकार काम करणार आहेत. नवनवीन उपक्रम घेऊन येणाऱ्या प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Loading...
You might also like