शेतकर्‍यांसाठी महत्वाचं ! घर बसल्या मदत करण्यासाठी मोदी सरकारनं उचललं मोठं पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर पडू न शकल्याने शेतकरी त्रस्त आहेत. ते कृषी अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्रात देखील जाऊ शकत नाही. परंतु पिकांची कापणी आणि पेरणी वेळेवर करावी लागेल, अशा परिस्थितीत किसान कॉल सेंटर शेतकऱ्यांसाठी मोठी मदत म्हणून उदयास आले आहे. कृषी मंत्रालयाने किसान कॉल सेंटर चालू ठेवले आहे. कॉल सेंटरच्या नंबरला कृषी शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक मोबाइलवर डायव्हर्ट करण्यात आले आहे. जेणेकरून ते घरी बसून शेतकऱ्यांना सल्ला देत राहतील. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या मते, सध्या सुमारे 20 हजार शेतकरी शेतीसाठी फोन करून वैज्ञानिक सल्ला घेत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला शेतीसंदर्भात कोणत्याही अडचणी असतील तर काळजी करण्याची गरज नाही.

देशात 21 किसान कॉल सेंटर असून कोणतेही बंद करण्यात आलेले नाही. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आपण कॉल करून आपल्या शेतीशी संबंधित समस्यांचे निराकरण करू शकता. फार्म टेली अडवायझर आपला प्रश्न ऐकून त्याला उत्तर देईल. यासाठी, लँडलाइन किंवा मोबाईलद्वारे 1800-180-1551 वर कॉल करू शकता. दरम्यान, सुमारे 125 कृषी तज्ञ किसान कॉल सेंटरमध्ये कॉल रिसिव्ह करतात आणि समस्या सोडवतात. हे तज्ञ फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालना, मधमाशी पालन, रेशीम पालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय, बायोटेक्नॉलॉजी, गृह विज्ञानात पीजी किंवा डॉक्टरेट आहेत. जरी त्वरित कॉल रिसिव्ह नाही केला तर सेंटरमधून शेतकऱ्यांना पुन्हा कॉल केला जातो. किसान कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना मजकूर संदेश किंवा व्हॉईस मेसेजेस देखील पाठविले जातात.

मोबाईलवर माहिती मिळविण्यासाठी नोंदणी

   शेतकरी 51969 किंवा 7738299899 वर एसएमएस पाठवून नोंदणी करू शकतात. यासाठी संदेश बॉक्समध्ये, “किसान GOV REG <नाव>, <राज्य नाव>, <जिल्हा नाव>, <ब्लॉक नाव> असा संदेश मोहून तो दिलेल्या क्रमांकावर पाठवू शकता.

–   इंटरनेट-जाणकार शेतकर्‍यांसाठी वेब नोंदणी – जे शेतकरी इंटरनेट सुविधा आहेत ते पोर्टलवर नोंदणी करू शकतात किंवा ते जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात (सीएससी) जाऊन नोंदणी करू शकतात. वेब नोंदणीसाठी http://mkisan.gov.in/hindi/wbreg.aspx हि वेबसाईट देण्यात आली आहे.

काय आहे हेतू ?

21 जानेवारी 2004 रोजी कृषी मंत्रालय आणि भारत सरकार यांच्या प्रयत्नातून किसान कॉल सेंटर सुरू करण्यात आले. शेतकर्‍यांचे प्रश्न तातडीने सोडविणे हे यामागील उद्दीष्ट आहे. म्हणूनच सर्व राज्ये व ठिकाणांनुसार किसान कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्त मराठी, गुजराती, तेलगू, भोजपुरी, छत्तीसगढी, तमिळ आणि मल्याळम यासह २२ भाषांमध्ये माहिती उपलब्ध आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like