आयुर्वेद पदवीधारकांसाठी खुशखबर ! मिळणार ऍलोपॅथिकचा दर्जा अन् दरमहा 60 हजारांचे वेतन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आयुष संचालनालयाचे संचालक कुलदीप कोहली यांनी नगरविकास व सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाने काढलेल्या शासन निर्णयाचा आधार घेत आयुर्वेद पदवीधारकांना ऍलोपॅथिक पदवीधारकांप्रमाणेच समकक्ष असा दर्जा दिला आहे. त्याचबरोबर कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या बीएएमएस, बीयुएमएस व बीएचएमएस या डॉक्‍टरांना समान दर्जा देऊन समान वेतन द्यावे, असेही स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमरता जाणवू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यातील बीएएमएस, बीएचएमएस डॉक्‍टरांची सेवा घेतल्यास त्यांना किती वेतन अथवा मानधन देणे योग्य राहील, याची माहिती सादर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला दिले होते. तर दुसरीकडे महापालिकांच्या विविध प्राधिकरणांनी कंत्राटी पद्धतीने सेव घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदांची भरती काढली. मात्र वेतनात एकसुसूत्रता दिसत नाही.

काही महापालिकांनी ३० हजार त काहींनी ४० ते ५० हजार मानधन निश्चित केले. त्यामुळे एकसूत्रता येण्यासाठी या डॉक्टरांना किमान ६० हजार दरमहा मानधनद्यावे असे आयुष संचालनालयाचे संचालक कोहली यांनी काढलेल्या पत्रात म्हंटले आहे. त्याचबरोबर याची तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र पाठविले आहे.

एक हजार लोकांमागे किमान एक डॉक्‍टर असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्व आहे. परंतु, राज्याची लोकसंख्या साडेबारा कोटींवर आहे तर ऍलोपॅथिक, होमिओपॅथिक व आयुर्वेदिक आणि युनानी डॉक्‍टरांची संख्या दोन लाख ८५ हजारांपर्यंत आहे. १५ विमा रुग्णालयचे ४५ लाख नोंदणीकृत कामगारांसाठी असून तेथे डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. २३ जिल्हे व ९१ उपजिल्हा रुग्णालये असून एक हजार ८२८ प्राथमिक आरेाग्य केंद्रे आणि १० हजार ६६८ उपकेंद्रे आहेत. तेथे डॉक्टरांनी संख्या अपुरीच आहे. त्यामुळे सेवानिवृत्त डॉक्‍टर, परिचारिकांची मदत घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.