खुशखबर ! मोदी सरकार 50 लाख सरकारी कर्मचार्‍यांना मोठे ‘गिफ्ट’ देण्याच्या तयारीत

दिल्ली : वृ्त्तसंस्था – जर देशाची आर्थिक परिस्थिती उत्तम राहिली तर मोदी सरकार येत्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील नवा अर्थसंकल्प 5 जुलैला मांडण्यात येईल.

त्यात नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण या अर्थसंकल्प मांडतील. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय कर्माचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोग लागू करण्यावर विचार केला जाऊ शकतो. मिळालेल्या वृत्तानुसार निर्मला सीतारामण यांना 7 व्या वेतनाबाबत कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहे यांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्थमंत्री सीतारामण या अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या निधी जाहीर करु शकतात.

जर असे झाले तर तब्बल 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. 7व्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसी नुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतनात वाढ करून ते 18 हजार केले होते मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून ते 26 हजार पर्यंत केले जावे अशी मागणी केली जात आहे.

निवडणूकीआधी केंद्र सरकार 7 व्या वेतनाबाबत वरिष्ठ आधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत होते मात्र निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा प्रश्न बरगळा होता. याआधी पहिल्या कार्यकाळात केंद्र सरकारने पेन्शन धारकांना आणि कर्माचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवून तो 9 टक्क्यावरुन 12 टक्के केला होता. या 3 टक्के वाढीमुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 9168.12 कोटी रुपयांचा भार पडणार होता. तर सरकारच्या या निर्णयाचा 48. 41 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला होता तर 62.03 पेन्शन धारकांना देखील याचा लाभ मिळाला होता.

आता 7 वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर नक्की किती भार पडेल हे देखील लवकर कळेल. परंतू लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आधिक असल्याने तिजोरीला नक्कीच भार सहन करावे लागेल हे मात्र स्पष्ट आहे.