ग्राहकांसाठी चांगली बातमी : आता मोबाइल अ‍ॅपद्वारे समजणार, वस्तू ‘असली’ की ‘नकली’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आता जर तुम्ही बाजारातून असे सामान आणण्यासाठी जाल, ज्यावर आयएआय किंवा हॉलमार्क आहे, तर तुम्ही ताबडतोब जाणून घेऊ शकता की ही वस्तू खरी आहे बनावट. भारतीय मानक ब्यूरो म्हणजे बीआयएसने हे जाणून घेण्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे.

’इखड उअठए’ नाव आहे मोबाईल अ‍ॅपचे
भारतीय मानक ब्यूरोने बीआयएस केयर नावाचे एक मोबाईल अ‍ॅप लाँच केले. हे अ‍ॅप ग्राहकांसाठी खर्‍या आणि बनावट वस्तूंमधील फरक जाणून घेण्यास मदत करेल. उदाहरणार्थ जर तुम्ही बाजारात पंखा किंवा अन्य कोणती वस्तू खरेदी करण्यासाठी जाल तर त्यावर आयएसआय मार्क असतो. जर तुम्हाला शंका असेल की पंखा त्या ब्रँडचा वाटत नाही, जे नाव त्यावर आहे. तर तुम्ही या अ‍ॅपवर आयएसआय मार्कचा नंबर लिहून त्या कंपनीची पूर्ण माहिती अ‍ॅपवर पाहू शकता. नंबर लिहिलताच मालकासह त्या ब्रँड आणि कंपनीची पूर्ण माहिती तुमच्या मोबाईल अ‍ॅपवर येईल.

अ‍ॅप सांगेल सोने खरे की बनावट
याच अ‍ॅपद्वारे सोन्याची शुद्धता ओळखता येऊ शकते. सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य करण्यात आला आहे, पुढच्या वर्षी 1 जानेवारीपासून हे लागू होणार आहे. सोन्याचा हॉलमार्क नंबर सुद्धा याच मोबाइल अ‍ॅपमध्ये टाकून पाहता येईल की सोने खरे आहे किंवा नाही. केंद्रीय ग्राहक मंत्री रामविलास पासवान यांनी अ‍ॅप लाँच करताना म्हटले की, सरकारने ग्राहकांच्या हिताच्या सुरक्षेसाठी अनेक पावले उचलली आहेत.

अ‍ॅपवर तक्रार सुद्धा दाखल करू शकता
या अ‍ॅपचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की, जर तुम्हाला वस्तू नकली आढळली तर ताबडतोब त्याच अ‍ॅपद्वारे तुम्ही तक्रार दाखल करू शकता. मोबाइल अ‍ॅप कोणत्याही अँड्रॉईड फोनमध्ये डाऊनलोड करू शकता. अ‍ॅप सध्या हिंदी आणि इंग्रजीतच आहे आणि ते गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येते.