नोकरदारांसाठी Good News ! नोकरी बदलल्यास आता PF प्रमाणे ‘ग्रॅच्युएटी’ही ट्रान्सफर होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदार वर्गाला सरकारकडून काहीसा दिलासा देण्याची तयारी सुरु आहे. नोकरदार वर्गाला नोकरी बदलल्यानंतर आता पीएफ प्रमाणे आता ग्रॅच्युएटीही ट्रान्सफर करता येणार आहे. म्हणजेच तुम्ही एका कंपनी राजीनामा देऊन नव्या ठिकाणी जॉईन झाल्यास तुम्हाला ग्रॅच्युएटीसाठी जुन्या कंपनीमध्ये खेटे घालावे लागणार नाहीत ज्या प्रमाणे तुमचा पीएफ दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होतो. त्याच प्रामाणे ग्रॅच्युएटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेऊन नियम लागू करण्यात येणार असून, केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

ग्रॅच्युएटीच्या रचनेत होणार बदल
सध्याच्या ग्रॅच्युएटीच्या रचनेत बदल करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्र सरकार, कर्मचारी संघटना आणि उद्योग यांच्यातील ग्रॅच्युएटीच्या रचनेत बदल करण्यात येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ग्रॅच्युएटीला सीटीसीचा एक भाग बनवण्याचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी पुढील महिन्यात अधिसूचना प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. सध्या एक वर्ष नोकरी केली तर 15 दिवसांच्या पगाराएवढी ग्रॅच्युएटी मिळते. यामध्ये वाढ करुन ती 30 दिवसांच्या पगाराएवढी करण्याची मागणी होत आहे. मात्र, या मागणीला उद्योगांचा विरोध आहे.

कोणाला मिळतो ग्रॅच्युएटीचा फायदा ?
पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी अ‍ॅक्ट 1972 नुसार ज्या कंपनीमध्ये एकादा कर्मचारी 10 किंवा अधिक वर्षे काम करतो. त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रॅच्युएटीचा फायदा मिळतो. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली किंवा बदलली , निवृत्त झाला असेल आणि त्याने ग्रॅच्युएटीचे सर्व नियम पूर्ण केले असतील तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटीचा लाभ मिळतो.