खुशखबर ! शेतकर्‍यांना फक्‍त १५ दिवसात मिळणार ३ लाखाचं स्वत व्याजदाराचं ‘कर्ज’ आणि ‘किसान क्रेडिट कार्ड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात अनेक शेतकरी सावकाराकडून गरज म्हणून कर्ज घेतात आणि अखेर शेतकऱ्यांकडून हे सावकार आधिक प्रमाणात रक्कमेचा परतावा घेतात. यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी मोदी सरकार एक अभियान राबवणार आहे. यासाठी सरकाराने किसान क्रेडिट कार्डवर फोकस करणार आहे. जेणे करुन एखाद्या व्यकतीकडून अथवा सावकाराकडून महाग कर्ज घेण्यापेक्षा बँकामधून स्वस्त कर्ज घेऊन ते शेतीसाठी वापरु शकतील. यासाठी बँकांना सरकारने सक्त निर्देश दिले आहेत की शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना केसीसी देणे. किसान क्रेडिट कार्डसाठी सरकारने गावाच्या स्तरावर अभियान चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
देशात सध्या फक्त ७ कोटी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे, तर एकूण शेतकरी परिवार १४.५ कोटी आहेत. असे यामुळे की बँकांनी यासाठी सुरु केलेली प्रक्रिया अत्यंत जटिल केली आहे. जेणे शेतकऱ्यांना कमीत कमी कर्ज मिळेल.

मात्र सरकारचा मानस आहे की २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. यासाठी सरकारचे लक्ष आहे की शेतकऱ्यांनी बँकाकडून कर्ज घेऊन शेती करावी. यासाठी सरकारने केसीसीसाठी लागणारे शुक्ल संपवले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, सरकार प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना केसीसी देऊ इच्छित आहेत. यासाठी केंद्र सरकार राज्यांना सोबत घेऊन सरकार काम करु इच्छित आहेत.

१५ दिवसात मिळणार केसीसी
शेतकऱ्यांना केसीसी मिळावे म्हणून गावात जेथे कॅम्प लावण्यात येईल त्यात शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांचे ओळखपत्र, राहिवासी प्रमाण पत्र, आधार कार्ड, जामिनीचे रेकॉर्ड आणि फोटे अशी कागद पत्रे लागतील. याच कागदपत्रांच्या आधारे बँकांना शेतकऱ्यांना केसीसी द्यावे लागेल. जिल्हा स्तरीय बँकर्स समिती गावात कॅप लावेल. तर राज्य स्तरीय समिती याची तपासणी करेल. नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, आता बँकांना अर्ज केल्यानंतर १५ दिवसात केसीसी देणे आवश्यक आहे.

सर्वात स्वस्त असेल केसीसी लोन
शेती करणाऱ्या व्याजदर तसे तर ९ टक्के आहे. परंतू सरकार यात २ टक्के सब्सिडी देते. अशाने हे कर्ज ७ टक्के होते. परंतू वेळेत परत केल्यास ३ टक्के आधिक सूट मिळते, यामुळे वेळत कर्ज परतावा करणाऱ्यांना ४ टक्के व्याजदर राहिलं. कोणताही सावकार एवढे स्वस्त व्याजाने कर्ज देत नाहीत. यामुळे जर शेतकऱ्यांनी बंधवाना कर्ज हवे असेल तर या केसीसीचा लाभ घ्यावा यात तुम्हाला स्वस्त व्याजदरात ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like