Good News For Farmers | ‘या’ सरकारचा 2.46 लाख शेतकर्‍यांना मोठा दिलासा, तब्बल 980 कोटींचे कर्ज केलं माफ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंड सरकारने (Jharkhand Government) राज्यातील लाखो शेतक-यांना (Good News For Farmers) दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 2 लाख 46 हजार शेतकऱ्यांचे 980 कोटींचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Chief Minister Hemant Soren) यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 50 हजारांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी गेल्या वर्षी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कर्ज माफ करण्याच्या योजनेची अधिकृत घोषणा केली होती.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Mansukh Hiren Death Case | प्रदीप शर्मांनंतर आता NIA कोणावर करणार कारवाई?

झारखंडचे Jharkhand कृषीमंत्री बादल पत्रलेख (Agriculture Minister Badal patralekh) म्हणाले की,
झारखंड शेतकरी कर्जमाफी योजना आमच्या सरकारच्या महत्वाच्या योजनांपैकी एक आहे.
या योजनेमुळे कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या (Good News For Farmers) चेह-यावर आनंद पसरले आहे.
नुकत्याच जाहीर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेचा उल्लेख होता.
आता ही योजना टप्प्याटप्प्यांने अंमलात आणत आहोत.
सरकारने आतापर्यंत 2,46,012 शेतकऱ्यांचं कर्ज माफ केले आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी एकूण 980.06 कोटींचा निधी दिला आहे.
या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना लवकर मिळावा म्हणून बँकींग banking क्षेत्राचीही मदत घेतली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपली खाती आधारशी लिंक करून घ्यावीत, असे आवाहनही केले आहे. दरम्यान गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झारखंड सरकारने 9 लाख शेतकऱ्यांचे 50 हजारांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये budget अनुदान स्वरुपात 2 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web title : Good News for Farmers jharkhand government waived loans farmers worth rs 980 crore

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित

Pune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना

Serum Institute of India | सीरम पुढील महिन्यापासून मुलांसाठी सुरू करणार कोवोव्हॅक्सची ट्रायल ! सप्टेंबरपर्यंत लाँचिंगची अपेक्षा