गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. कोकणात जाणाऱ्या नागरिकांकडून टोल न आकारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो गणशभक्तांचा फायदा होणार आहे.
[amazon_link asins=’B0734VLDTC,B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’452cc14f-b1c3-11e8-a248-4b94798f59f3′]

या निर्णयानुसार, कोकणात जाण्यासाठी ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूली केली जाणार नाही. याशिवाय कोल्हापूर मार्गेही प्रवाशांना टोल फ्री प्रवास करता येणार आहे. गणेशभक्तांना परतीचा प्रवासही टोल फ्री होणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. टोलमाफी केल्यामुळे गाड्या टोलनाक्यांवर थांबणार नाहीत, त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यताही कमी असणार आहे. गेल्यावर्षीही सरकारने गणेशोत्सव काळात गणेशभक्तांसाठी अशाचप्रकारे टोल माफी केली होती.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणेला फटकारले 

जाहिरात