त्रिपुरा : सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! आजपासून लागू होणार महागाई भत्ता आणि डीआर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  त्रिपुराच्या बिप्लब सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता १ मार्च २०२१ म्हणजेच आजपासून वाढवण्याचे आव्हान केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी ट्विट करून सांगितले की, स्टेट कॅबिनेट सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त पेंशन धारकांच्या महागाई भत्यामध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील १ लाख सरकारी कर्मचारी आणि ६०,००० पेंशन धारकांना फायदा होणार आहे.

त्रिपुराचे सरकार करणार ३२० करोड रुपयांचा अतिरिक्त खर्च

त्रिपुराचे कायदा मंत्री रतनलाल नाथ म्हणाले, राज्य सरकार २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेंशन धारकांच्या महागाई भात्यातील वाढीवर ३२० करोड रुपये अतिरिक्त खर्च करणार आहे. १ मार्च २०२१ पासून डीएमध्ये वाढ लागू होईल, असे राज्य सरकारने सांगितले. यातील १.१ लाख कर्मचाऱ्यांसाठी, तर ६० हजार पेंशन धारकांना आणि रोज कमाई करून खाणाऱ्या लोकांना १२ हजारचा फायदा होईल. तसेच डीए आणि Dearness Relief मध्ये सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढ केली आहे.

आधीच्या डाव्या सरकारने आमच्यावर आर्थिक भार टाकला

रतनलाल नाथ पुढे म्हणाले, गेल्या डाव्या सरकारने आमच्यावर भारी आर्थिक भार टाकला आहे. त्यामुळे आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. २०१८ मध्ये बीजेपी- आईपीएफटी च्या सरकारी भात्यात आपण आल्यापासून प्रथमच महागाई भत्ता आणि पेंशनमध्ये वाढ केल्यास जाहीर केले आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.