फ्रान्स पुढच्या महिन्यात पाठवणार आणखी 5 राफेल लढाऊ विमाने

पोलिसनामा ऑनलाईन – भारताला फ्रान्समधून पुढच्या महिन्यापर्यंत राफेल लढाऊ विमानांची आणखी एक खेप मिळण्याची शक्यता आहे. दुसर्‍या बॅचमध्येही 4 ते 5 राफेल भारताकडे पाठवले जाऊ शकतात. याआधी अंबाला इथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राफेल लढाऊ विमानांना औपचारिकपणे भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आले आहे.

पूर्व लद्दाखमध्ये चीनबरोबरचा सीमा वाद तर दुसरीकडे भारताई हवाई क्षमता वाढ शत्रूला धडकी भरवित आहे. 10 राफेल विमाने भारतात पाठवण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दसॉल्ट एव्हिएशनला सांगितले आहे. 5 विमाने ही भारतीय वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आली आहेत. राफेलच्या खास ट्रेनिंगसाठी भारताने आपल्या पायलट आणि क्रू मेंबर्सना फ्रान्समध्ये पाठवले होते. त्यात भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांसह इंजिनिअर आणि तंत्रज्ञांचा समावेश होता. दरम्यान, चीनसोबत सुरू असलेल्या सीमा तणावादरम्यान पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली खेप गुरुवारी बाला एयरबेसवर आयोजित कार्याक्रमात अधिकृतरित्या वायुसेनेत सामील करुन घेण्यात आली. अंबाला वायुसेना अड्ड्यावर आयोजित कार्यक्रमात 5 राफेल विमानांना भारतीय वायुसेनेत सामील करण्यात आले.