Jio युजर्ससाठी खुशखबर ! कंपनीने दिली ‘ही’ मोठी भेट

पोलिसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. लोकांना घरातून बाहेर येण्यास बंदी आहे, जर अत्यावश्यक काम असेल तरच लोकं बाहेर पडू शकतात. तसेच अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर इतर सगळी दुकाने बंद आहेत. दुकानात मोबाइल रिचार्ज करण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जिओने आता ग्राहकांचे हित लक्षात घेत मोठे पाऊल उचलले आहे. जिओच्या ग्राहकांना भेट मिळाली असून जिओ सिम युजर्ससाठी खुशखबर आहे.

जिओने लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला असून जिओ ग्राहक फिजिकल स्टोअर व्यक्तिरिक्त युपीआय, एटीएम, एसएमएस आणि कॉलद्वारे रिचार्ज करू शकतात. पण काही ग्राहक याचा वापर करू शकत नव्हते. कंपनीने जिओ फोन युजर्सला १०० मिनिट कॉल करण्यासाठी मोफत दिली असून सोबत १०० एसएमएस देखील मोफत दिले आहे. जिओने या ऑफरची वैधता १७ एप्रिल पर्यंत ठेवली आहे.

ऑफर संपल्यावर काय?
या ऑफरचा कालावधी संपल्यावरही जिओ फोन युजर्सला मोफत कॉलिंग सुविधा मिळणार आहे. सध्या देशातील बऱ्याच टेलिकॉम कंपन्यांवर आर्थिक संकटात आहेत. आणि अशात जिओची ही भेट ग्राहकांसाठी एखाद्या खुशखबर पेक्षा कमी नाही. जिओ टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठी ऑपरेटर असून कंपनीकडे टेलिकॉम मार्केटचे ३२.०४ टक्के शेअर आहेत. तसेच जिओकडे ५६ लाख युजर्स आहेत. जिओनंतर एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर असून विलीनीकरणाने बनलेली वोडा-आयडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.