Jio च्या ग्राहकांसाठी खुषखबर ! 1 .64 रूपयांत मिळेल 500 MB डेटा, वर्षभर रिचार्जमधून मुक्ती, जाणून घ्या प्लॅन…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दूरसंचार कंपन्यामध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. ग्राहकांसाठी निरनिराळे प्लॅन्स बाजारात आणले जात आहेत. अशातच देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. यात ग्राहकांना फक्त 1.64 रुपयांत 500 एमबी डेटा मिळत आहे. ज्यांना सतत रिचार्ज करण्यापासून मुक्ती हवी आहे, अशा ग्राहकांसाठी हा प्लॅन उत्तम आहे. तसेच ज्यांना अधिक डेटा हवा आहे, अशा युजर्ससाठी देखील हा प्लॅन चांगला आहे.

Reliance Jio चा हा प्लॅन 2399 रुपयांचा आहे. यात ग्राहकांना केवळ 1.64 रुपयांमध्ये 500 एमबी डेटा दिला जात आहे. Jio चा हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या प्लॅनपैकी हा एक प्लॅन आहे. यात डेटा सोबतच अनलिमिटेड कॉलिंग अन् इतर सुविधाही दिल्या जात आहेत. Reliance Jio च्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. याचाच अर्थ 365 दिवसांसाठी कंपनी ग्राहकांना 730 जीबी डेटा देत आहे. याचाच अर्थ 1 जीबी डेटाची किंमत होते 3.28 रूपये. यानुसार पाहिल तर 500 एमबी डेटाची किंमत 1.64 रूपये इतकी आहे. तसेच कंपनीने या प्लॅनसोबत सर्व ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही दिली आहे. तसेच कंपनी ग्राहकांना JioTV, JioCinema, JioCloud, JioSecurity, आणि JioNew सारख्या अॅप्सचही सबस्क्रिप्शनही देत आहे.