नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! फक्त 3 दिवसात मिळणार PF ची संपुर्ण रक्कम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) जास्तीत जास्त तीन दिवसात भागधारकांचे सर्व दावे निकाली काढण्याची तयारी करत आहे. या निर्णयामुळे नोकरी करणार्‍या लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. या निर्णयामुळे फक्त तीन दिवसात नोकदारांना आपले पीएफ पैसे मिळू शकतील.

केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त सुनील बर्थवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ ई-तपासणी प्रणाली देखील सादर करेल. त्याचा हेतू तपासणीची प्रक्रिया सुलभ करणे आणि योग्य गरजांशिवाय समोरासमोर चौकशीची प्रक्रिया कमी करणे हा आहे. ज्याद्वारे लोक सहजपणे पीएफचे पैसे काढू शकतात.

सध्या पीएफ पैसे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे काढता येतात. मात्र ऑनलाइनसाठी 30 दिवस लागतात. त्यामुळे हा निर्णय नोकरीधारकांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.

UAN ची समस्याही मार्गी लागेल –

बर्थवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेटा हाताळणीमुळे काही कर्मचारी यूएएन (12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर) तयार करण्यास अक्षम आहेत. त्या दृष्टीने, ईपीएफओ कर्मचारी डेटाबेसद्वारे पडताळणीच्या वैकल्पिक प्रणालीचा विचार करीत आहे. ईपीएफओ केवायसी लाभार्थ्यांसाठी तीन दिवसांत खटले निकाली काढण्याच्या दिशेने काम करीत आहे. या लाभार्थ्यांचे यूएएन आधार आणि बँक खात्याशी जोडलेले आहेत आणि त्यांच्याकडे नोंदणीकृत मोबाइल नंबर आहे अशीही माहिती बर्थवाल यांनी दिली

असे काढा PF चे पैसे-

सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाइटला भेट द्या. यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून अकाउंट लॉग इन करा.
त्यांनतर मॅनेज टॅबवरील केवायसी पर्यायावर क्लिक करा. त्यावर आधार, पॅनकार्ड व मागील तपशील पडताळणी केली आहे की नाही याविषयी माहिती विचारली जाईल. त्यांनतर ऑनलाइन सेवा पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये स्क्रीनवरील सदस्य तपशील, केवायसी तपशील दिसेल. त्यावर क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन क्लेमसाठी प्रोसीड वर क्लिक करावे लागेल.

आरोग्यविषयक वृत्त –