PUBG चाहत्यांनो, भारतात पुन्हा करणार एंट्री? नवं नाव असेल…

नवी दिल्ली : PUBG च्या ऑनलाईन गेमचे अनेक चाहते आहेत. मात्र, भारतात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या गेमवर बंदी आणण्यात आली. पण आता PUBG पुन्हा भारतात एंट्री करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कंपनीने गेमच्या रिलाँचिंगबाबत ट्रेलरही प्रदर्शित केला होता.

भारतात PUBG ची पुन्हा एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, आता हीच गेम नव्या नावाने लाँच होणार असल्याचे वृत्त दिले जात आहे. Gemwire च्या वृत्तानुसार, PUBG मोबाईल गेमच्या इंडियन व्हर्जनचे नाव आणि पोस्टर समोर आले आहे. कंपनी भारतात हा गेम नव्या नावाने लाँच करण्याची शक्यता आहे. PUBG कॉर्पोरेशन भारतात ‘Battleground Mobile India’या नावाने PUBG गेम लाँच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या गेमचे रिलाँचिंग केले जाणार असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. गेल्या आठवड्यात कंपनीने गेमच्या रिलाँचिंगचा ट्रेलरही प्रदर्शित केला होता. मात्र, नंतर कंपनीने तो व्हिडिओ डिलिट केला.

Krafton या PUBG मोबाईलची पॅरेंट कंपनीने 7 एप्रिलला भारतात एक नवीन वेबसाईट डोमेन www.battlegroundsmobileindia.in रजिस्टर केले असल्याचा दावाही Gemwire कडून करण्यात आला आहे. मात्र, हा गेम भारतात केव्हा लाँच होईल याची तारीख सांगण्यात आलेली नाही.