पुणेकरांसाठी Good News ! सलग 15 दिवसांपासून ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येत घट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना पुण्यात वाढणाऱ्या रुग्ण संख्येने चिंता वाढवली होती. मात्र, आता राज्यासह पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना पहायला मिळत असल्याने दिलासा मिळत आहे. गेल्या 15 दिवसांपेक्षा जास्त काळापासून नव्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूमध्येही होत असलेली घट कायम आहे. सातत्याने रुग्णांच्या संख्येत घट कायम राहणे हे सकारात्मक चिन्ह असल्याचं म्हटलं जातंय.

आज (सोमवार) दिवसभरात पुण्यात 214 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ही गेल्या काही काळातील सर्वात निच्चांकी रुग्ण संख्या समजली जाते. रुग्ण संख्या घटली असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज दिवसभरात 505 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 44 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान पुण्यात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 9 रुग्ण हे पुण्याबाहेरचे आहेत.

सध्या पुण्यामध्ये 799 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 434 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 214 नवीन रुग्ण आढळून आल्याने पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 631 एवढी झाली आहे. पुण्यात सध्या 9 हजार 198 रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत पुण्यात 4001 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करण्यात आली असून आता केवळ 33 मायक्रो कंटेन्मेंट झोन्स आहेत.