खुशखबर ! आता घरबसल्या रेल्वेचं तिकीट करा ‘कॅन्सल’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रवाशांना आधुनिक व अधिकाधिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी रेल्वे नवनवीन तंत्रज्ञानाची मदत घेत आहे. यापूर्वी रेल्वेचं तिकीट कॅन्सल करण्यासाठी प्रवाशांना बराच खटाटोप करावा लागत होता. मात्र आता रेल्वेच्या नव्या सुविधेनुसार रेल्वेचं तिकीट कॅन्सल करण्यासाठी आणि पैसे रिफंड मिळवण्यासाठी प्रवाशांना धावपळ करण्याची गरज नाही. प्रवाशांना थेट घरबसल्या एका फोन कॉलवर रेल्वेचं तिकीट कॅन्सल करता येणार आहे.

असे करा घरबसल्या रेल्वेचं तिकीट कॅन्सल –
रेल्वे टिकीट कॅन्सल करण्यासाठी रजिस्‍टर मोबाईल नंबरवरून १३९ क्रमांकावर कॉल करा. कॉल केल्यानंतर तुमच्या १० अंकी PNR नंबरची माहिती रेल्वेला द्यावी लागेल. त्यानंतर मोबाइल फोनवर एक वन टाइम पासवर्ड (OTP) मिळेल. तो OTP तो फोनवरून रेल्वेला कळवावा लागेल. त्यानंतर तुमचे तिकीट कॅन्सल होईल. तसेच कॅन्सल झालेल्या तिकिटाचा रिफंड मिळवण्यासाठी काउंटरवर जावे लागेल. त्यांनतर OTP ची माहिती दिल्लीनंतर पैसे परत मिळतील.

१३९ क्रमांकावरून मिळणाऱ्या सुविधा –
१३९ वर कॉल किंवा मेसेज करून रेल्वेचे वेळापत्रक , रेल्वेचे नाव- क्रमांक , PNR स्टेटस याविषयी माहिती मिळवता येते. तसेच या नंबरवर कॉल करून आता तुम्ही टॅक्सीही बुक करु शकता.

आरोग्यविषयक वृत्त

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

‘त्या’ महिलेचे स्तनांची रहस्यमय पद्धतीने वाढ, डॉक्टर्सही चिंतेत