राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर….दिवाळीपूर्वीच सातवा वेतन आयोग लागू करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या अगोदरच सातवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे ही माहिती आमदारांना दिली आहे. त्यामुळे दोन ते अडीच महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य सरकारने चालवलेल्या चालढकलीबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यास अगोदरच दोन-अडीच वर्षांचा विलंब झाला आहे, त्यात आणखी दिवाळीपूर्वी की दिवाळीनंतर असा मुहूर्त बघण्याची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी उपस्थित केला आहे.

यामुळे सातवा वेतन आयोग व अन्य मागण्यांसाठी ७ ते ९ ऑगस्ट असे तीन दिवस राज्य कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे. तसेच लवकरात लवकर ३१ जुलैपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सातवा वेतन आयोग व अन्य प्रश्नांवर बैठक घ्यावी, असे निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिले आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची राज्यात कशाप्रकारे अंमलबजावणी करता यावी, यासाठी माजी सनदी अधिकारी के.बी. बक्षी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याच्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी सुमारे १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आयोग लागू कधी होणार हे सांगण्यात आलं नव्हते.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची राज्यात कशा प्रकारे अंमलबजावणी करता येईल, यासाठी माजी सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांची समिती स्थापन केली आहे. राज्याच्या २०१८-१९च्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष आयोगाची अंमलबजावणी कधीपासून करणार, याबाबत राज्य सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नव्हते.