विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 ली ते 12 वी पर्यंतची सर्व पुस्तके PDF द्वारे उपलब्ध

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे गेल्यावर्षीपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे शाळेतील आणि महाविद्यालयांमधील क्लास हे ऑनलाईनच्या माध्यमातून घेतले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ (PDF) च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत.

कोरोना टाळेबंदीमुळे शाळा, महाविद्यालये, स्टेशनरी शॉप बंद असल्याने विद्यार्थ्यांकडे पुस्तके उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. हे पाहता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हि खास करून पहिली ते बारावी पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांना जी पुस्तके हवी आहेत ते डाऊनलोड करून अभ्यास करू शकणार आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण पाहिजे ती पुस्तके डाऊनलोड करू शकता.

पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी लिंक –
https://www.questionpaper365.com/2021/04/e-books-for-mahrastra-board.html