‘कोरोना’च्या संकटामध्ये मोदी सरकारसाठी चांगली बातमी ! 11 महिन्याच्या ‘उच्चांकी’वर पोहचली कोअर सेक्टरची ‘ग्रोथ’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – कोरोना महामारी संकटाच्या दरम्यान मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात आठ प्रमुख उद्योगांचा समावेश असलेल्या कोअर सेक्टरची ग्रोथ 11 महिन्यांच्या उच्चांकावर गेली आहे. भारतातील आठ मूलभूत उद्योगांचा विकास दर फेब्रुवारीमध्ये 5.5 टक्क्यांवर असतो.

या उद्योगांमध्ये चांगली वाढ
जानेवारीत कोअर सेक्टरच्या उत्पादनात फक्त 2.2 टक्के वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी बद्दल बोलायचे म्हणले तर, फेब्रुवारी 2019 मध्ये कोअर सेक्टरमध्ये 2.2 टक्क्यांनी वाढ झाली होती. रिफायनरी उत्पादनांमधील वाढ आणि वीज निर्मितीत प्रामुख्याने कोअर सेक्टरमध्ये चांगली वाढ दिसून आली.

2019 मध्ये शेवटचे महिने कोअर सेक्टरच्या उत्पादनाच्या बाबतीत खूपच खराब होते. डिसेंबर महिना देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक बातमी देऊन गेला. देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात सलग चौथ्या महिन्यात घट झाली होती. यानंतर, जानेवारी 2020 मध्ये कोर सेक्टरमध्ये 2.2 टक्क्यांची वाढ नोंदली गेल्याची माहिती समोर आली.

महत्त्वाचे म्हणजे कोअस सेक्टर 8 प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा, क्रूड, तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, स्टील, सिमेंट आणि वीज यांचा समावेश आहे. देशातील औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) आठ कोअर उद्योगांचे वजन 40.27 टक्के असते. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या मुख्य उद्योगांचे उत्पादन आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या सहामाहीत सुस्त झाले आहे.

फेब्रुवारीमध्ये कोळसा, रिफायनरी उत्पादने आणि वीज अनुक्रमे 10.3 टक्के, 7.4 आणि 11 टक्के वाढले. तथापि, कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि स्टील क्षेत्रात उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले.

मागील वर्षी अशी झाली होती वाढ
मंगळवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, रिफायनरी उत्पादने, खते, स्टील, सिमेंट आणि वीज या आठ मूलभूत उद्योगांमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये 2.2. टक्क्यांची वाढ नोंदली गेली होती.