नोकरदारांसाठी मोठी बातमी ! सरकार बदलू शकतं सुट्टीच्या संदर्भातील ‘हा’ नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकार नवी वर्षात पुरूष कर्मचार्‍यांना मोठी भेट देऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने पॅटरर्निटी लीव्ह म्हणजे पितृत्व रजा संदर्भात वेगळी नॅशनल पॉलिसी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग तसेच इंडस्ट्रीसोबत चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात कन्सल्टेशनच्या प्रक्रियेला गती देण्यात येईल आणि सरकारसह इंडस्ट्री आणि ट्रेड युनियन्सची त्रिपक्षीय बैठक होईल. यामध्ये पॉलिसीच्या रूपरेषेवर चर्चा केली जाईल.

सध्या देशात पॅटरर्निटी लीव्हच्या बाबतीत कोणतीही नॅशनल पॉलिसी नाही. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 15 दिवसांची पॅटरर्निटी लीव्ह देण्याची व्यवस्था आहे. यानुसार काही खासगी कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना 15 दिवसांची पेड लीव्ह देत आहेत. तर काही खासगी कंपन्या यापेक्षाही कमी लीव्ह देत आहेत. अनेक खासगी कंपन्या आपल्या पुरूष कर्मचार्‍यांना हा फायदा देत नसल्याचे दिसत आहे.

पॉलिसी तयार करून ही रजा 15 दिवसांनी वाढविण्याची योजना करून त्यास कायद्याचे स्वरूप दिले जावे असा कामगार मंत्रालयाचा प्रयत्न आहे. ही योजना पॉलिसीच्या रूपात आणल्याने सर्व खासगी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना याचा फायदा मिळू शकणार आहे. तसेच 15 दिवसांची मर्यादाही वाढविण्यात येणार आहे. परंतु, इंडस्ट्रीशी संबंधीत सूत्रांच्या म्हणण्यानुसार मॅटर्निटी लीव्हप्रमाणे ही रजा 26 आठवड्यांची करता येणार नाही. कारण एकुण श्रमशक्तीमध्ये पुरूषांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याप्रकारच्या रजेला जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत वाढवता येऊ शकते.

पुरूष आणि महिला कर्मचार्‍यांमधील रजेचे अंतर कमी करण्याचाही प्रयत्न सरकार करत आहे. कारण खासगी कंपन्या महिला कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी तयार होतील.

सरकार करत असलेली ही प्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. आता कन्सल्टेशनची प्रक्रिया सुरू होणार आहे. खासगी क्षेत्र आणि इंडस्ट्रीची यावर कोणती भूमिका आहे, हे यातून स्पष्ट होणार आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/