Pune Metro News | पुणेकरांसाठी खुषखबर ! कोथरुडमध्ये मेट्रोची चाचणी, 3 डब्याची रेल्वे रुळावर धावली (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro News |अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पुणेकरांसाठी एका खुषखबर आली आहे. कोथरुड मेट्रोची तांत्रिक चाचणी गुरुवारी रात्री घेण्यात आली आहे. पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रो डेपो ते आनंदनगर या परिसरात मेट्रोची चाचणी झाली. तीन डब्यांची मेट्रो या रुळावरुन धावली. Good news from Pune Metro test in Kothrud
२०१९ मध्ये वनाज ते डेक्कन कॉर्नर दरम्यान मेट्रो सुरु होईल, अशी घोषणा निवडणुकीपूर्वी खासदार गिरीश बापट यांनी केली होती. त्यावरुन तेव्हा वादही झाला होता. मात्र, ही केवळ घोषणाच राहली. त्यानंतर २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि मेट्रोचे कामच ठप्प झाले होते. काही महिन्यांनंतर ते पुन्हा सुरु झाले. सध्या वनाज ते पौडफाटा दरम्यान लोहमार्ग व विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. मात्र पौडफाटा येथील दुहेरी पुलाचे काम अजूनही बाकी आहे. तसेच या मार्गावरील एकही स्टेशन अजून बांधून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मेट्रोची तांत्रिक चाचणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष मेट्रो धावण्यासाठी काही महिन्यांची वाट पहावी लागणार आहे, असे सध्या सुरु असलेल्या कामावरुन दिसून येते.

त्याचवेळी पिंपरी येथील मेट्रोची कामे वेगाने सुरु आहे. निगडी ते संत तुकारामनगर मार्गावरील कामे पूर्ण झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करुन त्याची पाहणी केली होती. त्यामुळे पिंपरी मार्गाचे लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते व्हावे, यासाठी भाजपा नेत्यांचा प्रयत्न आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title :  Good news from Pune Metro test in Kothrud