खुशखबर ! सोन-चांदी सलग दुसऱ्या दिवशी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : व्रतसंस्था – रुपया मजबूत झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत सराफा बाजारात सलग दुसर्‍या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात दहा ग्रॅम सोन्याची किंमत २१५ रुपयांनी घसरून ३८,६७६ रुपये झाली. सोन्यासह चांदीच्या किंमतीही बुधवारी खाली आल्या आहेत. चांदी ७७० रुपयांनी घसरली आहे. या किंमतीत घट झाल्यामुळे राष्ट्रीय राजधानीत एक किलो चांदीची किंमत आता ४७,६९० रुपयांवर पोहोचली आहे.

का स्वस्त झाले सोने
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे रुपया मजबूत झाला आहे आणि मजबूत रुपयामुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. जागतिक पातळीवरील किमतींविषयी बोलायचे झाल्यास, न्यूयॉर्कमध्ये बुधवारी सोने प्रति औंस १५०० डॉलर्स आणि चांदीची किंमत १७.८१ डॉलर प्रति औंसवर बंद झाली.

दोन दिवसांत ३०० रुपयांनी स्वस्त झाले सोने
सलग दोन दिवसांत १० ग्रॅम सोन्याचे दर ३६५ रुपयांनी स्वस्त झाले. मंगळवारी सोन्याच्या किंमती १५० रुपयांनी घसरल्या, तर बुधवारी २१५ रुपयांनी घसरल्या. अशा प्रकारे दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत एकूण ३६५ रुपये प्रतितोळा घट झाली.

कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे आणि गुंतवणूकदारांचे प्रमाण घटल्याने भारतीय शेअर बाजारामध्ये रुपया वधारल्याने बुधवारी भारतीय रुपया ३५ पैशांनी वधारून डॉलरच्या तुलनेत डॉलरच्या तुलनेत ७१.४३ वर होता.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली
दागिने वगळता भारतीयांनी गेल्या एक महिन्यात गोल्ड ETF मध्ये (एक्सचेंज ट्रेडेड फंड) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये १४५ कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. मागील ९ महिन्यांत प्रथमच गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक दिसून आली. सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे सोन्याच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे. गुंतवणूकदार यास सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय मानत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like