खुशखबर…! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील चार दिवसात सोन्याच्या दरात ६०० ते ८०० रुपयांची घसरण झाली आहे. आज (१८ जुलै) सोन्याचा दर प्रति तोळा ३० हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे.

सुमारे पाच महिन्यांनंतर सोन्याचे दर कमी झाले आहेत. ८ फेब्रवारी २०१८ नंतर सोन्याचा भाव ३१ हजारांच्या खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरांमध्ये घसरण आणि स्थानिक सराफांकडून कमी झालेली मागणी यामुळे सोन्याचा दर कमी झाल्याचं समजतं.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c5832ccb-8a8d-11e8-80ff-3544317f5e72′]

दुसरीकडे चांदीच्या दरातही प्रतिकिलो ६२९० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी तीन महिन्यांच्या निचांकी स्तरावर पोहोचल्याने आता प्रतिकिलो ३९ हजार २०० रुपयांचा दर मिळत आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं मागील एक वर्षाच्या निचांकी स्तरावर पोहोचलं आहे, ज्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसत आहे. दरम्यान येत्या काही काळात सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.