Today Gold Price : आतापर्यंत 12000 रुपयांनी सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले सोने आता स्वस्त झाले आहे. लग्नसराईचा मोसम सुरू झाल्याने सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. मागील एक वर्षात सोन्यामध्ये तब्बल 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. पुढील महिन्यात लग्नसराईचा मोसम सुरू होत असताना सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली असून, सोने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

सोने-चांदी दरात आज तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव आज 0.4 टक्के वाढीसह 44 हजार 95 रुपयांवर आहे, तर चांदीचा दर 0.6 टक्के वाढून 67 हजार 273 रुपये प्रतिकोलो ग्रॅमवर पोहाेचला आहे. सोन्याच्या किमतीत आतापर्यंत जवळपास 12 हजार रुपयांपर्यंत घसरण झाली आहे, तर चांदी 11 हजार रुपये स्वस्त झाली आहे. चालू वर्षात 2021 मध्ये सोन्याच्या भावामध्ये जवळपास 6 हजार रुपयांनी सोने स्वस्त झाले आहे.

24 कॅरेट गोल्ड रेट

आठवड्याच्या पहिल्या दिवशी राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48 हजार 180 रुपये आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेटचा भाव 46 हजार 170 रुपये, मुंबईत 44 हजार 880 रुपये, तर कोलकातामध्ये 46 हजार 950 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यापार 0.14 डॉलरच्या तेजीसह 1,727.22 डॉलर प्रतिऔंस इतका भाव आहे, तर चांदी 0.09 डॉलर वाढीसह 26.02 डॉलर इतकी आहे.

सोने-चांदीमध्ये खरेदी वाढण्याची शक्यता

भारतामध्ये सोने जास्त प्रमाणात खरेदी केले जाते. येत्या काळात भारतामध्ये लग्नसराईचा मोसम सुरू होत आहे. त्यामुळे सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या किमतीत सोने खरेदी करून सोन्यात गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण जाणकारांच्या मते चालू वर्षात 2021 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर 63 हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याबाबत एका हिंदी वेवसाइटने वृत्त दिले आहे.

मार्चमध्ये सोन्याच्या दरात 2238 रुपयांची घट

सोन्याच्या दरामध्ये मागील काही दिवसांपासून घट होत आहे. फक्त मार्चमध्ये सोन्याच्या दरात 2238 रुपयांची घसरण झाली आहे, तर जानेवारी ते मार्च या तीमाहित सोन्याच्या दरात 5870 रुपयांची घट झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असला तरी कोरोनावर लस उपलब्ध झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करणे कमी केल्याने सोन्याच्या दरात घट होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सोने आणखी कमी होण्याची कारणे

केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांच्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात 2.5 टक्क्यांनी घट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. केडिया यांच्या माहितीनुसार, येत्या काळात सोन्याच्या दरात आणखी घसरण होईल. सोन्याचे दर 42500 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.