खूशखबर…! एसबीआयच्या ग्राहकांसाठी खूशखबर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था

देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने फिक्स्ड डिपॉजिट्सवर व्याजदर वाढवले आहे. एफडीच्या व्याजदरांवर 5 ते 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. म्हणजेच 0.05 टक्के ते 0.1 टक्के व्याजदर वाढवण्यात आला आहे. 100 बेसिस पॉईंट 1 टक्क्याच्या बरोबरीचा असतो. हे नवे व्याजदर 30 जुलैपासून लागू होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या वेबसाईटवर सांगितले आहे की, 1 ते 2 वर्षाच्या एफडीवर आता 6.70% टक्के व्याजदर मिळेल जे आधी 6.65 टक्के होते. दुसरीकडे 2 ते 3 वर्षाच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजदर मिळणार आहे जे आधी 6.65 टक्के होतं. वरिष्ठ नागरिकांसाठी 1 ते 2 वर्षाच्या एफडीवर 7.15% ऐवजी आता 7.20% व्याज तर 2 ते 3 वर्षाच्या एफडीवर 7.15% ऐवजी 7.25% व्याजदर मिळणार आहे. हे व्याजदर 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू असणार आहेत.
[amazon_link asins=’9312147242′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7e5b81b-9406-11e8-9df3-cd704103ff25′]
कमी कालावधी साठी  ठेवण्यात आलेल्या मोठ्या रक्कमेच्या एफडीवरील व्याजदर कमी करण्यातआले असून ते . 1 ते 2 वर्षासाठी 1 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या एफडीवर आधी 7% व्याजदर होता आता तो 6.70% झाला आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी असलेला व्याजदर 7.50% वरुन 7.20% करण्यात आला आहे.