खुशखबर ! ‘या’ पाच सरकारी विभागांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल, तर या पाच सरकारी विभागांतील रिक्त जागा तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आल्या आहेत. आरोग्यसेवक, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, विस्तार अधिकारी आणि इतर पदांसाठी एकून 13,521 रिक्त जागांची यादी जाहीर केली आहे. संबंधित विषयात माध्यमिक. डिग्री / डिप्लोमा धारक या पदांसाठी अर्ज सादर करून शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिलपर्यंत आहे.

पदाचे नाव : आरोग्य सेवक, लिपीक, स्थापत्य अभियंता सहायक, विस्तार अधिकारी, औषध निर्माता

पद संख्या : 13,521

रिक्त जागांचे जिल्हानिहाय वर्गीकरण –

अहमदनगर – 729,
अकोला – 242,
अमरावती – 463,
औरंगाबाद – 362,
वांद्रे – 142,
हिंगोली – 150,
लातूर – 286,
नाशिक – 687

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे.

पात्रता :

औषध निर्माता – B.Pharm, औषध निर्मितीत पदवी किंवा समतुल्य
विस्तार अधिकारी आणि वरिष्ठ सहायक – मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी
स्थापत्य अभियंता पदासाठी – स्थापत्य अभियांत्रिकी एक वर्षाचा डिप्लोमा

अर्ज करण्याची मुदत –

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 26 मार्च 2019
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 16 एप्रिल 2019

अर्ज शुल्क –

सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी 500 रूपये
एससी/एसटी वर्गासाठी 250 रुपये