खुशखबर ! ‘शिर्डी-पुणे-मुंबई’ शहरांसाठी ‘हेलिकॉप्टर’ सेवा सुरू, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे तसेच मुंबईमधील अनेक साई भक्त असे आहेत ज्यांना देवदर्शनासाठी वन डे रिटर्नची ट्रीप करायची असते. परंतु त्यांना हा प्रवास एका दिवसात करणं शक्य होत नाही. जर तुम्हीही यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण हा प्रवास आता एका दिवसात शक्य होणार आहे. इतकेच नाही तर ज्या प्रवाशांना आता पुणे – शिर्डी किंवा मुंबई असा प्रवास करायचा आहे तो एका दिवसांत आणि कमी वेळेत शक्य होणार आहे. कारण ब्लेड इंडियानं यासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे.

आता ज्यांना पुण्यातून मुंबई आणि शिर्डी असा प्रवास करायचा आहे अशा प्रवाशांसाठी 45 मिनिटांमध्ये हा प्रवास शक्य होणार आहे. कंपनीनं मुंबई – शिर्डी मार्गावर हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. पुण्याच्या मुंढव्यातील केशवनगरमध्ये ब्लेडनं हेलिपॅड उभारलं आहे. येथून नुकतीच पुणे – शिर्डी आणि पुणे – मुंबई अशी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना जुहू आणि महालक्ष्मी येथेही जाणं शक्य होणार आहे.

कंपनीनं याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, तिन्ही मार्गाचं भाडं, वेळापत्रक आदीची माहिती ब्लेड इंडियाच्या वेबसाईटवर https://flyblade.in/  मिळणार आहे. इतकेच नाही तर पुणे, मुंबई आणि शिर्डीनंतर राज्यातील इतर शहरांमध्ये आणि देशातील विविध राज्यांमध्ये हेलिकॉप्टर सेवा सुरू केली जाणार आहे.” असंही कपंनीनं सांगितलं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही ब्लेड इंडियाची वेबसाईट https://flyblade.in/ ला भेट देऊ शकता.