पोस्ट ऑफिसकडून नवीन सुविधा सुरू ! आता लाईनमध्ये न थांबता घरबसल्या करा पैशांची देवाण-घेवाण, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातेधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट (DOP) ने पोस्ट ऑफिसच्या बचत खातेधारकांना मोबाईल बँकिंग सेवा सुरु केली आहे. पोस्ट ऑफिसने एक सर्क्युलर (पत्रक) काढून या बाबतची घोषणा केली आहे. यानुसार ही सेवा सर्व बचत खातेधारकांना 15 ऑक्टोबरपासून वापरता येणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) च्या बचत खातेधारकांसाठी मोबाईल बँकिंग सेवा आधीच सुरु केली आहे. आता ही सेवा पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी देखील सुरु होणार आहे. यामुळे छोट्या योजनांची अंमल बजावणी करणे सोपे होणार आहे.
कशी करायची नोंदणी ?
बचत खातेधारकांना मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी सगळ्यात आधी खातेधारकांना पोस्ट ऑफिस बचत बँक एटीएम/ इंटरनेट/ मोबाइल बँकिंग अर्ज भरावा लागणार आहे. जर एखाद्या धारकाने KYC पूर्ण केलेली असेल तर या अर्जानंतर त्या खातेधारकाला पुन्हा एकदा KYC पूर्ण करावी लागणार आहे.
ही असेल पात्रता ?
सगळ्यात आधी ग्राहकांकडे CBS पोस्ट ऑफिसचे बचत खाते असणे आवश्यक आहे.
ग्राहकांकडे नेट बँकिंग असणे गरजेचे आहे, जर नसेल तर CIF असले पाहिजे.
सिंगल किंवा जॉईंट अशा दोनीही प्रकारच्या खातेधारकांना याचा लाभ मिळू शकतो.
मोबाईल बँकिंगने करू शकता ही कामे
मोबाईल बँकिंगच्या मदतीने अकाउंट बॅलेन्स, NSC, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट (RD), लोन याबाबतची माहिती पाहता येऊ शकते.
बचत खाते आणि PPF बाबतची ट्राजेक्शन हिश्ट्री, मिनी स्टेटमेंट पाहता येऊ शकते.
एका बचत खात्यावरून दुसऱ्या बचत खात्यावर पैसे पाठवू शकतात.
बचत खात्यातून RD किंवा PPF अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर केला जाऊ शकेल.
मोबाईल बँकिंगनी अनेक अवघड कामे सहज करू शकता यामध्ये टाइम डिपॉजिटचा देखील समावेश आहे.
कसे कराल ऍप डाउनलोड
इंडिया पोस्ट मोबाइल बँकिंग ऍप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. मोबाइल बँकिंगची सुविधा वापरण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला आपला मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. एका मोबाइल नंबरचा वापर एकदाच केला जाऊ शकतो. अर्ज जमा केल्यानंतर चोवीस तासात आपली सेवा सुरु होणार आहे.
Visit : Policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण