Good News : ‘कोरोना’ला हरवण्यात सर्वात पुढे भारतीय, बरे होणार्‍या रूग्णांमध्ये भारत पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : जगात कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांच्या प्रकरणात सोमवारी भारत पहिल्या स्थानावर पोहचला. जॉन हापकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकड्यांनुसार, भारतात 37 लाख 80 हजारपेक्षा जास्त लोक महामारीतून बरे झाले आहेत. भारताने या बाबतीत ब्राझीलला मागे टाकले. जगात महामारीतून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1.9 कोटींच्या जवळपास आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 78 टक्केवर पोहचला आहे.

भारतात सोमवारी 92,701 रूग्ण सापडल्यानंतर एकुण प्रकरणे 48 लाख 46 हजार 427 वर पोहचली आहेत. यापैकी सक्रिय रूग्ण 9 लाख 86 हजार 598 आहेत. देशात 1136 मृत्यूंसह कोरोनामुळे जीव गमावणार्‍या मृतांची संख्या 79,722 वर पोहचली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण बरे झाले
देशात बरे झालेल्या रूग्णांच्या प्रकरणात प्रमुख पाच राज्यांबाबत बोलायचे तर महाराष्ट्रात कोविडच्या सर्वाधिक प्रकरणांसह सर्वात जास्त बरे होणारे रूग्ण सुद्धा येथे आहेत. परंतु, 69.79 टक्के रिकव्हरी रेटने महाराष्ट्र अन्य राज्यांच्या मागे आहे. महाराष्ट्रात 10,60,308 रूग्ण आहेत, ज्यापैकी 7,40,061 बरे झाले आहेत. यूपीत रिकव्हरी रेट 76.74%, आंध्र प्रदेशात 82.36%, तमिळनाडुत 88.98%, कर्नाटकमध्ये 76.82% आहे.

जगात एका दिवसातील प्रकरणे सर्वोच्च स्तरावर
डब्ल्यूएचओनुसार, मागील 24 तासात विक्रमी 3,07,930 रूग्ण सापडले आहेत, जी आतापर्यंत कोणत्याही दिवसात सापडलेल्या रूग्णांपेक्षा सर्वात जास्त संख्या आहे. यामध्ये 60 टक्के केस तीन देश अमेरिका, ब्राझील आणि भारतात सापडल्या आहेत. जगात मृत्यूंची संख्या 9,17,417 पर्यंत पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी लोकसभेत म्हटले की, लॉकडाऊनमुळे 37 ते 78 हजार लोकांचा जीव वाचवता आला. चार महीने चाललेल्या देशव्यापी बंदीने 14-29 लाख कोरोना प्रकरणांसुद्धा रोखले. मार्चच्या तुलनेत, आयसोलेशन बेडमध्ये 36.3 पट आणि आयसीयू बेड्समध्ये 24.6 पट वाढ झाली. सहा महिन्यांपूर्वी देशात पीपीई किट तयार केला नव्हता, परंतु आता देश याची निर्यात करण्याच्या स्थितीत आहे.