देशाला मार्चपर्यंत कोरोना लस मिळणार, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचा अंदाज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर अद्यापही लस मिळाली नाही. अनेक देश कोरोनावरील लस शोधण्यात मग्न आहेत. असे असतानाच एक गुड न्युज समोर आली आहे. मार्च 2020 पर्यंत देशाला कोरोनावरील लस मिळणार असल्याची माहिती जगातील सर्वात मोठ्या लस नर्माता कंपनी सीरम इंन्स्टिटयुटचे ( (SSI) कायर्कारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी ही माहिती दिली. कंपनीकडून देशात ऑक्सफर्ड- अ स्ट्राझिनिका कंपनीच्या लसीवर चाचणी घेतली जात आहे.

डॉ. जाधव म्हणाले, देशाला मार्च 2021 पर्यंत कोरोनावरील लस मिळेल. यासाठी प्रशासनाने लवकर मंजूरी दिली तर ते शक्य आहे. अनेक कंपन्या या लसीवर काम करत आहेत. भारतातमध्ये यावर मोठ्या वेगाने यावर संशोधन सुरु आहे. देशात दोन कोरोना लसीची तिस-या टप्यातील चाचणी सुरु आहे. तर एका लसीची दुस-या टप्यातील चाचणी सुरु आहे.

डॉ. जाधव इंडिया व्हॅक्सिन अव्हेलॅबिलीटीला संबोधित करताना म्हणाले की, देशातील 55 टक्के लोकसंंख्याही ही 50 टक्केपेक्षा कमी वयाची आहे. मात्र उपलब्धता आणि रिस्कच्या आधारे ही लस अगोदर आरोग्य कर्मचा-यांना द्यावी. त्यानंतर ती इतरांना देण्यात यावी. आम्ही वर्षाला 70 ते 80 कोटी डोस बनवू शकतो. आम्ही डिसेंबर 2020 पर्यंत 6 ते 7 कोटी डोस तयार करत आहोत. मात्र परवानगी मिळाल्यानंतरच ही लस बाजारात येईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या नुसार पुढील वर्षाच्या दुस-या तिमाहीपयर्यंत कोरावरील लस तयार व्हायला हवी.

वयोमानानुसार लसीला मंजुरी
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, वयोमानानुसार परिमामकारक असलेल्या वेगवेगळ्या लसींना मंजुरी दिली जाऊ शकते. कोरोना लसीच्या वितरणाबाबत सरकारने तयारी सुरु केली आहे. एकापेक्षा जास्त कोरोना लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतात ज्या लसीची चाचणी सुरु आहे, ती डबल किंवा ट्रिपल डोसच्या लसी आहेत. संसोधकांच्या म्हणण्यानुसार एका लसच्या डोसच्या लसी पेक्षा दोन किंवा तीन डोसच्या लसी परिणामकारक ठरतात.