खुशखबर ! फक्त ४ हजार जमा करा, पेंशनच्या वेळी दर महिन्याला मिळवा ४८ हजार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधान मंत्री श्रम-योगी मानधन योजना सुरु करण्यात आली आहे, तसेच नेशनल पेंशन सिस्टम (NPS) आणि अटल पेंशन योजना (APY) जनतेसाठी सुरु आहे. या दोनीही योजना वृद्ध काळात प्रत्येक नागरिकांसाठी संजीवनी ठरणार आहेत कारण या योजनेची गॅरेंटी सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या योजनेचा खुप फायदा होणार आहे.

प्रधान मंत्री श्रम-योगी मानधन योजना
ज्या कामगाराचे वय ४० पेक्षा कमी आहे आणि तो इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत नाही असा व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतो. घरकाम करणारे नोकर चाकर, रिक्षा ड्राइव्हर, मजदुरी करणारे कामगार या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.

प्रत्येक महिन्याला मिळणार ३ हजार रुपये
या योजनेमध्ये सरकार प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये देणार आहे, लाभ घेऊ पाहणाऱ्या व्यक्तीकडे आधारकार्ड आणि बँकेचे सेविंग खाते असणे अनिवार्य आहे.

जर कोणी १८ वर्षाखालील व्यक्ती या स्कीमचा फायदा घेत असेल तर त्याला दर महा ५५ रुपये जमा करावे लागणार आहे.तर ४० वर्षा पेक्षा जास्त व्यक्तीला दर महिन्याला २०० रुपये जमा करावे लागणार आहेत ,मग ६० वर्षानंतर त्या व्यक्तीला पेन्शन सुरु होईल.

अटल पेंशन योजना
४० वर्षांपर्यंतचा व्यक्ती या योजनेसाठी पात्र होऊ शकतो. 5 हजार पेंशन साठी जर तुम्ही 35 व्या वर्षी सुरु कराल तर तो 25 वर्षांपर्यंत 6 महिन्यांमध्ये 5,323 रुपए जमा करावे लागणार आहे.

NPS योजनेअंतर्गत जर प्रत्येक महिन्याला नागरिकांनी ४,००० रुपये जमा केले तर रिटायरमेंट नंतर त्या नागरिकाला ४८,६२८ इतकी महिन्याला पेंशन मिळू शकते. या सर्व योजनांची अधिक माहिती जवळच्या बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त