खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ बॅंकेत विविध पदासाठी नोकरभरती सुरु; 23 मे अर्ज करण्याची शेवटची मुदत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत नोकरीचे स्वप्न पाहणा-यांसाठी बॅंकेत नोकरीची संधी चालून आली आहे. बसिन कॅथलिक को-ऑपरेटिव्ह बॅंकेत जनरल मॅनेजर पदापासून ते टायपिस्टपर्यंत विविध पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक अन् पात्र उमेदवारांना 23 मेपर्यत बॅंकेची अधिकृत संकेतस्थळावरून (https://www.bccb.co.in/Career.aspx) अर्ज करता येणार आहे.

1) टायपिस्ट (इंग्रजी आणि मराठी) :- या पदासाठी कोणत्याही विषयाचा पदवीधर असावा. तसेच उमेदवाराचे किमान 35 वर्षे आणि 5 वर्षांचा कामाचा अनुभव. तसेच इंग्रजी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. एमएस ऑफिसवर काम करण्याचा उमेदवाराला अनुभव असावा.

2) जनरल मॅनेजर (पोर्टफोलिओ-1)
एमबीए किंवा सीएची पदवी, एलएलबी, एलएलएम, सीएआयआयबीची पदवी असावी. तसेच उमेदवाराचे वय कमाल 50 वर्षे आणि 20 वर्षांचा अनुभव असावा.

3) चीफ फायनान्शियल ऑफिसर : सीएची पदवी. उमेदवाराचे वय कमाल 50 वर्षे आणि 20 वर्षांचा अनुभव असावा.

4) रिस्क ऑफिसर : या पदासाठी गणित, स्टॅटेस्टिक्स, इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी, एमबीए, सीए आणि सीएएफला प्राधान्य देण्यात येणार आहे.
उमेदवाराचे वय कमाल 50 वर्षे आणि 20 वर्षांचा अनुभव असावा.

5) डेप्युटी जनरल मॅनेजर (लीगल रिकव्हरी) : या पदासाठी एलएलब, एलएलएम, सीए. आयआयबीची पदवी असावी. वय 45 वर्षांपेक्षा जास्त आणि किमान 15 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

6) चीफ मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर एचआर : या पदासाठी पदवीधर किंवा पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन, एचआर इत्यादीमध्ये डिप्लोमा असावा. वयोमर्यादा 50 वर्ष असावी. एचआरच्या कामाचा 15 ते 20 वर्षाचा अनुभव असावा.

7) मॅनेजर / चीफ मॅनेजर – ट्रेड ट्रेनी : या पदासाठी कोणत्याही विषयाचा पदवीधर आणि आयआयबीएफचे सर्टिफिकेशन कोर्स केलेला असावा. कमाल वय 50 वर्षे, कामाचा किमान 10 वर्षांचा अनुभव असावा. डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, चीफ मॅनेजर, क्रेडिट सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस, एमबीएमची पदवी असणे गरजेचे आहे. तसेय वय कमाल 50 वर्ष. कामाचा किमान 10 ते 15 वर्षाचा अनुभव असावा.