अानंदवार्ता ! 133 रुपयांनी LPG गॅस सिलेंडर स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिक चांगलेच त्रस्त होते. परंतु आता याच सामान्य नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. घरगुती गॅस सिलिंडर दरात कपात झाली आहे. घरगुती अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडर दरात ६ रुपये ५२ पैशांनी कपात करण्यात आल्याचे समोर आले आहे. याशिवाय विनाअनुदानित गॅस सिलेंडर दरात १३३ रुपयांनी स्वस्त करण्यात आला असल्याचे दिसत आहे. सदर कपातीमुळे नागरिाकांना दिलासा मिळाला आहे.

काही दिवासांपूर्वी वारंवार आपल्याला इंधनदरवाढीला सामारे जावे लागले होते. परंतु आता सहा महिन्यांनंतर एलपीजी सिलेंडरची किंमत कमी केली गेल्याचे दिसत आहे. जून 2018 पासून एलपीजीच्या किमती वाढत होत्या हे सर्वांना ठाऊक आहेच. इतकेच नाही तर 1 नोव्हेंबर रोजी आयओसी सबसिडीमध्ये एलपीजी सिलेंडरमध्ये वाढ 2.94 रुपयांनी वाढली होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रूड ऑइलच्या किंमती कमी झाल्यामुळे एलपीजीच्या किमती कमी झाल्या असल्याचे समजत आहे. यानंतर आयओसीने म्हटले आहे की, नॉन-सबसिडी एलपीजी सिलिंडरची किंमत 133 रुपये कमी करण्यात आली आहे.  दिल्ली अनुदानित 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 809.50 रुपयांत मिळणार आहे.  आतापर्यंत ही किंमत  942.50 रुपये इतकी होती. महत्त्वाचे म्हणजे  1 डिसेंबरपासून नवीन किमती लागू होणार असल्याचे समोर आले आहे.

आपणा सर्वांनाच  बाजार दराने सिलिंडर खरेदी करावा लागतो. याव्यतिरिक्त एका वर्षात, केवळ 12 सिलिंडर प्रत्येक कुटुंबाला सबसिडीसह मिळतात. मुख्य म्हणजे ही गॅस सबसिडी थेट  ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाते. इतकेच नाही तर सदर सबसिडी रक्कम प्रत्येक महिन्यात बदलत असते.

एका वर्षात, केवळ 12 सिलिंडर प्रत्येक कुटुंबाला सबसिडीसह मिळतात. त्यानंतर, बाजार दराने सिलिंडर खरेदी करावा लागतो. ग्राहकाच्या बँक खात्यात थेट गॅस सबसिडी दिली जाते. सबसिडी रक्कम प्रत्येक महिन्यात बदलते. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क वाढीनुसार एलपीजी दर अनुदान वाढवण्यासाठी आणि किंमत एकाच प्रमाणात अनुदान रक्कम कमी कमी केले जाते.