खुशखबर ! ‘लॉकडाऊन’नंतर महाराष्ट्र पोलिसांना मिळणार ‘बक्षीस’

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आलंय. हे लॉक डाऊन १४ एप्रिल पर्यंत देशात सुरु असणार असून, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कष्ट घेतोय.

त्यांच्या या कामाची दखल राज्य सरकारने च्या वतीने घेण्यात आली असून कोरोनाचे पडसात दूर होताच उत्कृष्ट रित्या कामगिरी बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येणार आहे. यासाठी अहवाल तयार करून तो गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल.

देशभरात लॉक डाऊन दरम्यान नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करणाऱ्या पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले. मात्र ते अहोरात्र देशहितासाठी कर्तव्य बजावत आहे. त्यासाठी पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टी देखील रद्द करण्यात आल्या आहे.

दरम्यान, पोलीसदलातील कर्तव्य निष्ठेबाबत वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकारने वेळेवेळी दखल घेतली आहे. त्या आधारेच कोरोनाचे संकट दूर होताच या अधिकारी वर्गाला योग्य ते पारितोषिक सन्मानित करण्यात येणार आहे.