Good News : मान्सूनचा प्रवास ‘सुपरफास्ट’ ! सकाळी पुण्यात लावली हजेरी, पहिल्यांदाच पुण्यासह अलिबागपर्यंत मान्सूनचे आगमन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी मान्सून Monsoon महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनने आपला प्रवासाचा वेग कायम ठेवत पुण्यात प्रवेश केला आहे. मान्सून Monsoon अलिबाग, पुणे, मेडक, नलगौंडा, श्रीहरी कोटा येथपर्यंत मजल मारली आहे. तसेच उस्मानाबाद  जिल्ह्यात देखील मान्सूनने प्रवेश केला असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

शनिवारी रात्री पुणे Pune शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनने सोलापूर, सातारा पर्यंत मजल मारली. त्यानंतर पुण्यातही प्रवेश केला असल्यासारखे वातावरण शनिवारी रात्री होते. त्यामुळे हवामान विभागाने Meteorological Department मान्सून पुण्यात आला असल्याचे जाहीर केले. परंतु रविवारी सकाळपासून लख्ख ऊन पडल्याचे पहायला मिळाले.

30 वर्षात पहिल्यांदाच मान्सून लवकर

पुण्यात यापूर्वी 8 जून रोजी मान्सून येत असतो. परंतु मागील 30 वर्षात प्रत्यक्ष आगमानवरुन पुण्यात मान्सूनचे आगमन 10 जून रोजी निश्चित करण्यात आले होते.

मात्र यंदा मान्सूनचे पुण्यात लवकर आगमन झाले आहे.

रविवारी सकाळी 8.30 पर्यंत शिवाजीनगर येथे 24.5 मिमी, पाषाण 10.1 मिमी आणि लोहगाव येथे 60.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मान्सूनचे बहुतांश भागात आगमन

मान्सूनच्या बंगालच्या उपसागरातील दुसऱ्या शाखेने आज जोरदार मुसंडी मारली आहे.

ईशान्य भारतातील बहुतांश भाग मान्सूने व्यापला आहे.

नागालँड, मणिपूर, मेझोराम, त्रिपूरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश तसेच पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये मान्सूनने प्रवेश केला आहे, अशी माहिती हवामान विभागाने जाहीर केली आहे.

Also Read This : 

 

Pune Crime News : शारीरिक संबंधाच्या बहाण्याने मिळवला व्हॉट्सअ‍ॅप नंबर, नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन केले ब्लॅकमेल, उकळलले पैसे

 

उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या

 

‘ज्यांना उद्योग नाही ते असे रिकामे मुद्दे उकरुन काढतात’, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

 

दात किडले असतील तर अवलंबा ‘हे’ 6 नैसर्गिक उपाय, वेदनांपासून मिळेल ताबडतोब आराम

 

उन्हाळ्यात वाढतो फुड पॉयजनिंगचा धोका, बचावासाठी जेवण बनवताना ‘या’ गोष्टींकडे ठेवा लक्ष, जाणून घ्या

 

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त