खुशखबर ! आता रेल्वेचं तिकीट आधी आरक्षित करा अन् नंतर पैसे द्या..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही रेल्वेने प्रवास करता? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता रेल्वेची तिकिटे उधारीवरही काढता येणार आहेत. पैसे नसताना रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC ने ‘ई-पे लेटर’ (ePayLater) ही नवीन योजना आणली होती. त्यानंतर आता ‘book now and pay later’ (आता आरक्षित करा, नंतर पैसे द्या’) ही उधारीवर तिकीट काढता येणारी नवीन योजना आणली आहे.

कसे करणार उधारीवर तिकिट बुक –

IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन तिकिट बुक करताना पेमेंट पर्यायावर जावे. तेथे गेल्यानंतर पेमेंट कसे करणार त्याचे ऑप्शन येतात. तेथे आता PayLater असा ऑप्शन असेल. त्यावर क्लिक केल्यावर ePayLater वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जाईल. त्यांच्या खात्यावर लॉगईन केल्यानंतर लगेचच तिकिट आरक्षित होणार आहे.

उधारीवर तिकिट बूक केल्यानंतर त्याची रक्कम १४ दिवसांत द्यावी लागणार आहे. मात्र यासाठी व्याजही आकारले जाणार आहे. सध्या ePayLater वर ही सुविधा मोफत मिळत आहे. मात्र काही काळानंतर यावर व्याज आकारले जाईल.

सध्या ऑनलाईन पैसे देतेवेळी समस्या आल्याने तिकिटे आरक्षित करण्यात अडचण येणाऱ्याला विशेष करून IRCTC च्या ‘book now and pay later’ ‘ या नवीन सेवेचा लाभ होणार आहे.