‘यामुळे’ आता 8 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर थेट पोहचणार मोदी सरकारच्या योजनांची माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार सध्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ पोहचवण्यासाठी मदत करत आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेमार्फत प्रयत्न सुरु आहेत की, जास्तीत जास्त शेतकऱ्यानपर्यंत पोहचता यावे. कारण जिल्हा अधिकाऱ्यानमार्फत सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीयेत. पीएम किसान योजनेसाठी देण्यात आलेल्या मोबाईल नंबर वरून सर्व शेतकऱ्यांना मेसेज पाठवण्यात आलेले आहेत.

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव राजबीर सिंह यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत ८ करोड शेतकऱ्यांचा डेटा सरकारकडे जमा आहे. त्यामुळे सरकारला आता शेतकर्यांपर्यंत सर्व योजनांची माहिती सहज देता येणार आहे. यामुळे ज्यांचे पी एम किसान योजनेमध्ये रजिस्टेशन आहे त्यांच्या पेन्शन स्कीमचा प्रीमियर किसान सम्मान निधीच्या पैशांमधून कट केला जाईल. म्हणजेच शेतकऱ्यांना आता पेन्शन योजनेसाठी आजून कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही.

शेतकरी पेन्शनसाठी अपात्र ठरला तर . . .
जर एखादा शेतकरी पीएम – किसान योजनेअंतर्गत मानधन योजनेमार्फत पेन्शन मिळवण्यासाठी अपात्र ठरला तर, अशा परिस्थितीत सुद्धा त्याचे पेन्शन खाते सक्रिय राहणार आहे. परंतु सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अंशदान (५०%) ला स्थगिती मिळेल. जर लाभार्थी या संधर्बातील पूर्ण रक्कम देण्यासाठी तयार असेल तर त्या खात्याला सुरु ठेण्याची परवानगी दिली जाईल. वर्ष वर्ष ६० झाल्यानंतर त्या व्यक्तीला सेविंग अकाऊंटच्या व्याजासकट हफ्ते माघारी घेण्याची परवानगी असेल.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like