खुशखबर! आता सरकार घेणार मोफत जेईई,नीट शिकवणी 

नवी दिल्ली:  वृत्तसंस्था

 

जेईई आणि नीटच्या परीक्षेसाठी असणाऱ्या खाजगी शिकवणीची फी भरताना  पालकांची चांगलीच आर्थिक दमछाक होते. आपल्या पाल्याने उच्च शिक्षण घ्यावे,  यासाठी हट्ट करतात. किंबहुना त्यांची अपेक्षा असते, मात्र जेईई आणि नीट फी, शिक्षणाचा खर्च परवडत नाही. याला आता पर्याय  निघाला निघाला असून उच्चशिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या JEE आणि NEET या परीक्षांसाठी सरकारकडून मोफत वर्ग चालविण्यात येणार आहेत.

 JEE आणि NEET या परीक्षांसाठी सरकारकडून मोफत वर्ग चालविण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले असून २०१९ पासून हे क्लासेस सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासासाठी त्याचा त्यांना उपयोय होणार आहे. या योजनेसाठी १ सप्टेंबर रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अॅप आणि वेबसाईटचं उद्घाटन करण्यात येणार आहे. याच दिवशी नोंदणी प्रक्रियेसदेखील सुरुवात होईल. ३० सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू राहील.

[amazon_link asins=’B01N0ZG2AC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’174c0e66-ac33-11e8-8d0f-415e0f3eaf6a’]

उच्च शिक्षण संस्थांमधील पदवी प्रवेशांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या आयोजनासाठी केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी नियुक्ती केली आहे. त्यामार्फत हे क्लासेस घेतले जाणार आहेत. सध्या या नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत प्रॅक्टीस सेंटर चालवले जातात ही संस्था आपल्या २,६९७ केंद्रांचं रुपांतर पुढील वर्षीपासून प्रशिक्षण केंद्रांत करणार आहे. हे प्रॅक्टिस सेंटर ८ सप्टेंबरपासून काम सुरू करणार आहेत.  यात खाजगी शिकवणीच्या दृष्टीने ही काहीशी धोक्याची गोष्ट असली तरीही विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.  यात मुख्य म्हणजे  खिश्याला न परवडणाऱ्या खाजगी शिकवणीची फी पासून त्यांची सुटका होणार आहे.
JEE Main प्रवेशासाठी मॉक टेस्ट घेण्यात येणार असून ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे. त्याच बरोबर मोबाईल अॅप्लिकेशन किंवा वेबसाईटच्या माध्यमातून हे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या परीक्षेचा निकालानंतर शिकवणीच्या  प्रवेशासाठी पात्र असणार आहे. ज्यांना  यामध्ये प्रवेश मिळणार नाही,  त्यांनी नेमकी काय चूक केली आहे, याबाबत सेंटरवरील शिक्षकांशी संवाद साधू शकतील. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

जाहिरात

You might also like