लयभारी ! आता चेहऱ्यावरून डाउनलोड करता येणार तुमचा आधार कार्ड, जाणून घ्या सोपा मार्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाची आणि फायदेशीर माहिती समोर आली आहे. भारतीय नागिकांसाठी आधार कार्ड (Aadhaar card) हे एक महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. अनेक खाजगी आणि सरकारी कामात आधार कार्डाची आवश्यकता असते. आणि ती बंधनकारकही आहे. आता मात्र व्यक्तीला अपडेटेड डिटेल्सबरोबर पाहिजे असेल तर याबाबत UIDAI चे एक नवे फीचर आले आहे. या नवीन फीचरचे नाव फेस ऑथेंटिकेशन (Face authentication feature) आहे. नव्या फीचरनुसार घर बसल्या याचा फायदा घेऊ शकता.

तसेच, आधार कार्डधारक व्यक्ती (Aadhar card holder) ऑनलाइनवरून आपल्या चेहऱ्याच्या साहाय्याने आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकणार आहे. यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. फेस ऑथेंटिकेशन फीचर विना OTP कार करते. या फीचरचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याला आधार सेंटरवर जाण्याची आवश्यकता नाही. स्वतः लॅपटॉपवरून हे करू शकणार आहे.

कसा कराल फीचरचा वापर?
– सर्वात प्रथम वापरकर्त्याला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागणार आहे.
– यानंतर होमपेजवर जाऊन, गेट आधार कार्ड (Get Aadhaar Card) चे ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
– क्लिक केल्यानंतर फेस ऑथेंटिकेशनचे (Face authentication) पर्याय दिसेल.
– या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नोंद असणारा मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा टाकावा लागणार.
– प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आपला चेहरा व्हेरिफाय करावे लागेल.
– यानंतर लॅपटॉप किंवा कम्प्यूटरचा कॅमेरा ओपन होईल त्या व्यक्तीचा चेहरा स्कॅन होईल. पूर्णपणे स्कॅन झाल्यानंतर त्या व्यक्तीचा फोटो घेतला जाईल. यासाठी चेहरा बरोबर कॅमेऱ्याकडे सरळ ठेवायचा आहे.
– ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकणार आहे.