खुशखबर ! RBI नंतर SBI चं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, ‘एवढया’ रक्‍कमेपर्यंत कमी होऊ शकतो होम लोनचा EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केल्यानंतर आता देशातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय देखील आपल्या व्याजदरांमध्ये लवकरच कपात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 1 ऑक्टोबरपासून बँकेने सर्व व्याजदर हे रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरांप्रमाणे केले असल्याने आता बँक याचा फायदा ग्राहकांना देखील देण्याचा प्रयत्न करणार आहे.
यामुळे आता ग्राहकांच्या गृहकर्जाच्या हफ्ता देखील कमी होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर आता एसबीआय 7.95 % या दराने गृहकर्ज देणार आहे. त्यामुळे कमी झालेल्या दराचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

गृहकर्जावर होणार इतकी बचत
जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर तुम्हाला 7.95 % च्या दराने गृहकर्जावरील व्याज भरावे लागणार आहे. त्यानुसार तुमचा कर्जाचा हफ्ता 25 हजार रुपये होणार आहे. त्यामुळे महिन्याकाठी तुमचे 468 रुपये वाचणार आहेत. हे नवीन दर लागू झाल्यानंतर तुम्हाला याचा प्रत्यक्ष फायदा मिळणार आहे.

आता इतका आहे रेपो रेट
आरबीआयने आपल्या बैठकीत 0.25 %  रेपो रेटमध्ये कपात केली असून यामुळे कर्जदारामध्ये देखील कपात होणार आहे. त्याचबरोबर कर्जाचा हफ्ता देखील कमी होणार आहे. महागाई दरामध्ये कमी येण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. त्याआधी ऑगस्टमध्ये देखील रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांची कपात केली होती. त्यामुळे आता रेपो रेट हे 5.15 टक्के इतका झाला आहे.