पुणेकरांसाठी खुशखबर ! धरण क्षेत्रात एकाच दिवसात सव्वा महिना पाणी पुरेल एवढा पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला असून, गेल्या २४ तासांत पाणीसाठ्यात २ अब्ज घनफूट (टीएमसी) ने वाढ झाली आहे. खडकवासला धरण प्रकल्पात बुधवारी १२.०७ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात १६.२३ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

पुणे शहर तसेच जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला शेतीसाठी खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने या धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. मागील वर्षी ५ ऑगस्ट रोजी धरणात २८.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा उलपब्ध होता. पण यंदाच्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी या चारही धरणात १२.०७ टीएमसी पाणी साथ शिल्लक आहे.

खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मंगळवारी एकूण ९.९६ एवढा पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या २४ तासात झालेल्या दमदार पावसामुळे बुधवारी धरणात १२.०७ पाणीसाठा झाला आहे. एका दिवसात खडकवासला धरण प्रकल्पात दोन टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा ( कंसात गेल्या २४ तासात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये )

खडकवासला – १.०० (६८)
वरसगाव – ५.०५ (१६५)
पानशेत – ५.०९ (१७७)
टेमघर – ०.९३ (१७०)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like