SBI च्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर ! 20 लाख रूपयांपर्यंतचा ‘मोफत’ विमा, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठी खुशखबर दिली आहे. बँकेच्या डेबिट कार्डधारकांना फ्रि इन्श्युरन्सची ऑफर मिळत आहे. बहुतांश लोकांना याबाबत माहिती नाही. लोक डेबिट कार्डचा वापर एटीएम मशीनमधून कॅश काढण्यासाठी करतात, किंवा शॉपिंगदरम्यान पेमेंट करण्यासाठी करतात, परंतु तुम्हाला तुमच्या कार्डवर निशुल्क वीम्याची सुद्धा ऑफर मिळते. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

एसबीआय डेबिट कार्डवर मिळतो फ्री इन्श्युरन्स
एसबीआय डेबिट कार्डवर कार्डधारकाला निशुल्क इन्श्युरन्सची सुविधा मिळते. वेगवेगळ्या डेबिट कार्डधारकांसाठी वेगवेगळे वीमा कव्हर मिळते. जसे की, एसबीआय रूपे प्लेटिनम डेबिट कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचे इन्श्युरन्स कव्हर मिळते. बँकांद्वारे जारी करण्यात आलेल्या डेबिट कार्डवर ग्राहकांना वीमा कवरची सुविधा मिळते. ज्यामध्ये पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर, पर्चेज प्रोटेक्शन कव्हर आणि परमनन्ट डिसअ‍ॅबिलिटी कव्हर सारखे इन्श्युरन्स कव्हर कोणत्याही खर्चाशिवाय मिळू शकते. या पार्श्वभूमीवर एसबीआय आपल्या डेबिट कार्ड धारकांना 20 लाख रूपयांपर्यंत वीमा कव्हर देते.

एसबीआय द्वारे मिळणार्‍या वीमा कव्हरमध्ये 20 लाख रुपयांपर्यंत कॉम्प्लिमेंटरी पर्सनल अ‍ॅक्सीडेंटल इन्श्युरन्स, 2 लाख रुपयांपर्यंतचे परचेस प्रोटेक्शन कव्हर आणि 50000 रुपयांपर्यंतचे अ‍ॅड ऑन कव्हर मिळते. या वीमा पॉलिसीअंतर्गत कार्डधारकाला गैर-विमान अपघात मृत्यु वीमा कव्हर मिळते, ज्यानुसार दुर्घटनेच्या तारखेपूर्वी 90 दिवसांच्या दरम्यान कोणत्याही चॅनल जसे एटीएम/पीओएस/ई-कॉमर्सवर कार्डचा कमीत कमी एकदा वापर केला असल्यास वीम कव्हर ऑपरेशनल होते. वीम्याच्या नियमानुसार डेबिट कार्ड होल्डर्सच्या मृत्यूच्या स्थितीत तो वाढवला जातो.

काय आहे या इन्श्युरन्समध्ये विशेष
पर्सनल एयर अ‍ॅक्सीडेंटल इन्श्युरन्स (मृत्यु) अंतर्गत जर विमान प्रवासादरम्यान डेबिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला तर त्यास पर्सनल अ‍ॅक्सीडेंटल इन्श्युरन्स दिला जातो. वीमा पॉलिसीच्या लाभासाठी जरूरी आहे की, वीमा धारकाने आपल्या एसबीआय डेबिट कार्डने तिकिट खरेदी केलेले असले पाहिजे.

एसबीआय परचेस प्रोटेक्शन अंतर्गत लाभ
एसबीआय परचेस प्रोटेक्शन अंतर्गत एखाद्या सामानाच्या खरेदीच्या 90 दिवसांच्या आत चोरी/लुटमार इत्यादीवर कव्हर मिळते. मात्र, यासाठी ग्राहकाने वस्तूचे बिल एसबीआय डेबिट कार्डने केलेले पाहिजे. वेतन पॅकेज खातेधारकांना जारी होणार्‍या डेबिट कार्डवर बँक 2 लाखांपर्यंत कव्हर देते. तर अ‍ॅड ऑन कव्हर अमाऊंट अंतर्गत डेबिट कार्ड धारकाच्या कुटुंबातील दोन सदस्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा खर्च आणि विमित व्यक्तीला परत घरी आणण्यापर्यंतचा खर्च रिइंबर्स केला जातो.

अ‍ॅड ऑन कव्हर्स प्लॅन
एसबीआयच्या डेबिट कार्ड धारकांना मिळणार्‍या वीमा पॉलिसी अंतर्गत अ‍ॅड ऑन कव्हर्ससुद्धा मिळते, ज्या अंतर्गत विमान प्रवासादरम्यान लगेज हरवले तर कार्ड धारकाला चेक्ड इन लगेज लॉस कव्हर मिळते. हे विमान कंपनीकडील कव्हरशिवाय अतिरिक्त असेल. यासाठी जरूरी आहे की, विमान प्रवासाचे तिकिट एसबीआय डेबिट कार्डद्वारे खरेदी केलेले असावे.