खुशखबर ! १ जुलैपासून SBI चे कर्ज होणार आणखी ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे.  SBI ने  १ जुलैपासून कर्जचा दर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  आरबीआयने रेपो रेटमध्ये नुकतीच कपात केली आहे.  आरबीआयच्या  नियमानुसार, ठेवीच्या आणि कर्जाच्या दरात कपात करणारी SBI भारतातील पहिली बॅंक ठरली आहे.

SBI ने मार्च २०१९ मध्येच बचत ठेव आणि कर्ज दर आरबीआयच्या रेपो रेटनुसार देण्याची घोषणा केली होती.  आरबीआयने रेपो रेटमध्ये ०. २५ % घट करण्याचा निर्णय घेतला आहे याचा सर्वात आधी फायदा एसबीआयच्या ग्राहकांना मिळणार आहे.

आरबीआयने  रेपोदरात ०. २५ टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रेपो दर म्हणजेच बँकांना आरबीआयकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर. यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत आहे. त्यामुळे आता SBI च्या या निर्णयामुळं कर्जदारांना मोठा दिलासा मिळू शकतो. परंतु याचा फायदा एसबीआयच्या  फक्त त्या खातेदारांना लागू होणार आहे, ज्यांच्या खात्यात एक लाखाहून अधिक रक्कम आहे.