स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 3850 पदांसाठी मेगा भरती, महाराष्ट्रात 517 जागा, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 3850 ऑफिसर्सच्या जागांसाठी नोकर भरती निघाली असून या पदासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागणवण्याचे काम 27 जुलै 2020 पासून सुरु झाले आहे. इच्छूक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2020 ही अंतिम मुदत आहे. उमेदवारांना मुदतीच्या आतच अर्ज करू शकतात.

या पदांची निवड प्रक्रिया SBI Officer Recruitment 2020 अंतर्गत केली जाईल. ज्या इच्छूक उमेदवारांना सर्कल बेस्ड ऑफिसर पोस्टसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. भारतीय नागरिक असलेल्या व्यक्ती या जागांसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती त्यांनी निवडलेल्या सर्कलमध्येच केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अर्ज करण्याची पात्रता, वॅक्सनीचं ब्रेक अप, अर्जाची फी आणि इतर माहिती जाऊन घेऊनच अर्ज करावा.

अर्ज करण्यास सुरुवात- 27 जुलै 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2020

कोणत्या राज्यात किती जागांची भरती होणार ते खालील प्रमाणे
1. गुजरात – 750 जागा
2. कर्नाटक – 750 जागा
3. मध्य प्रदेश – 296 जागा
4. छत्तीसगढ – 104 जागा
5. तामिळनाडू – 55 जागा
6. तेलंगणा – 550 जागा
7. राजस्थान – 300 जागा
8. महाराष्ट्र (मुंबई वगळून) – 517 जागा
9. गोवा – 33 जागा

पात्रता, शिक्षण आणि वयाची मर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही फॅकल्टीमधून पदवी घेतलेली असावी. ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेणे अवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2020 पर्यंत 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.

अशी असेल निवड प्रक्रिया
ऑफिसर पदासाठीची निवड ही शॉर्टलिस्ट आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. तसेच यासाठी लेखी परीक्षा घ्यायची की नाही हा अधिकार बँकेचा आहे. मेरिट लिस्ट ही उमेदवारांना मिळालेल्या मार्क्सच्या आधारे उतरत्या क्रमाने लावली जाईल. जे मार्क्स मुलाखतीच्या आधारावर दिले जातील

अर्जाची फी
उमेदवार जे जनरल/इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास/ओबीसी कॅटेगरीतील असतील त्यांना 750 रुपये अर्जाची फी भरावी लागेल. तर एससी/एसटी/पीडब्लूडी कॅटेगरीतील उमेदवारांना फी भरण्याची गरज नाही. यासंबंधी अधिक माहितीसाठी आपण एसबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावू शकता.