केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ वाहनांना टोलमाफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये इलेक्ट्रीक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. मात्र, चार्जिंग स्टेशनची योग्यती सोय न झाल्याने नागरिक इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना धजावत नाहीत. पुढील वर्षी इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्यात आल्या असून या वाहनांना टोलमाफीही करण्यात आली आहे. याबाबतचे आदेशही केंद्रसरकाने राज्य सरकरांना दिले आहेत. इलेक्ट्रीक वाहनांची वेगळी ओळख मिळण्यासाठी या वाहनांच्या नंबर प्लेट हिरव्या रंगात आणण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. या वाहनांच्या हिरव्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगात नंबर लिहला जाणार आहे.

यासंबंधी केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून खासगी टॅक्सीसाठीच्या इलेक्ट्रीक वाहनांची नंबरप्लेट हिरव्या रंगाची ठेवण्याचे आदेश दिले आहे. टॅक्सीवर लावण्यात येणाऱ्या हिरव्या रंगाच्या नंबर प्लेटवर पिवळ्या रंगात नंबर टाकण्याचे सांगण्यात आले आहे. निती आयोगाने केंद्र सरकारसाठी प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी केंद्र सरकारची सात मंत्रालय आणि अवजड उद्योगांची मदत घेण्यात आली आहे. यामध्ये खासगी टॅक्सीसाठी वापर होणाऱ्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी पार्किंग आणि टोल माफी करण्यात येणार आहे. हा फायदा वाहनांना होण्यासाठी आणि वेगळी ओळख पटवी म्हणून नंबरप्लेट हिरव्या रंगात देण्यात येणार आहे.