खुशखबर! शेतीसाठी जमीन नाही पण शेती करायची आहे तर SBI ने आणली आहे विशेष योजना, हे लोक करू शकतात अर्ज

दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला जर शेती करायची असेल आणि तुमच्याकडे जमीन नसेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही. तुम्ही एसबीआयच्या या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता. भारतीय स्टेट बँक शेती करण्यासाठी जमीन खरेदी करण्यास कर्ज देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता.
काय आहे एसबीआयची भू खरेदी योजना?
छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी मदत करणे हा एसबीआयचा उद्देश आहे. याशिवाय शेती करणारे भूमिहीन लोक सुद्धा जमीन खरेदी करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांकडे 5 एकरपेक्षा कमी असिंचित जमीन आहे. तसेच 2.5 एकर सिंचित जमीन असणाऱ्यांकडे भू-खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकतात. याशिवाय इतरांच्या शेतात काम करणारे भूमिहीन लोक सुद्धा यासाठी अर्ज सादर करू शकतात. अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमीत कमी दोन वर्षाचा कर्ज फेडीची नोंद असणे आवश्यक आहे. एसबीआय दुसऱ्या बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर विचार करू शकते. पण त्यांच्यावर इतर बँकांचे कर्ज असू नये.

या योजनेद्वारे अर्ज सादर केल्यानंतर बँक खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीच्या किमतीचे आकलन करणार आहे. त्यानंतर जमिनीच्या एकूण किमतीपैकी 85 टक्के कर्ज देऊ शकते. या स्कीमद्वारे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली जमीन बँकेकडे गहाण राहणार आहे. अर्जदाराने कर्जाची रक्कम फेडल्यानंतर जमीन त्याच्या ताब्यात देणार आहे.

या योजनेद्वारे कर्ज घेतल्यानंतर शेतीची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 वर्ष मिळतात. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर सहा महिन्याला कर्जाचे हप्ते फेडावे लागतील. तुम्ही 9 ते 10 वर्षात कर्ज फेडू शकता. खरेदी केलेली जमीन शेतीसाठी तयार असेल तर कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी 1 वर्षाला कालावधी मिळतो. पण जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाची रीपेमेंट सुरू करण्यासाठी 2 वर्षाचा वेळ दिला जातो.