खुशखबर ! भारताच्या ‘या’ Top 4 आयटी कंपन्या देतील 91,000 फ्रेशर्सला नोकरी

नवी दिल्ली : भारताच्या चार प्रमुख आयटी कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीस आणि विप्रोने सामुहिकपणे पुढील आर्थिक वर्षासाठी कॅम्पसमधून 91,000 उमेदवारांना नोकरी देण्याची योजना तयार केली आहे. कारण लॉकडाऊन कमी झाल्यानंतर मागणीत तेजी आली आहे.

टीसीएसचे कार्यकारी व्हीपी आणि जागतिक एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी म्हटले होते की, कंपनीला आशा आहे की, पुढील वर्षी सुद्धा तेवढ्याच फ्रेशर्सला कामावर ठेवले जाईल, जेवढे यावर्षी (जवळपास 40,000) होते. इन्फोसिसने म्हटले की, ते पुढील आर्थिक वर्षात भारतात 24,000 कॉलेज पदवीधरांनी नियुक्त करतील, जे 15,000 पासून चालू आर्थिक वर्षासाठी योजनाबद्ध होते.

एचसीएल टेक्नॉलॉजीसचे प्रमुख एचआर अधिकारी अप्पाराव व्हीव्ही यांनी म्हटले की, कामाचा वेग वाढण्याची अनेक कारणे आहेत. आम्ही जे लक्ष्य ठेवले होते, त्यापेक्षा 33% जास्त करत आहोत आणि आम्ही क्यू3 आणि क्यू4 मध्ये तेजी पहात आहोत. जर ग्राहकांनी आपली व्यस्तता वाढवली, तर त्यांना तिथेच जावे लागेल जिथे कौशल्य आहे. मागील वर्षी आमच्या मॅन पॉवरमध्धये 70% वाढ भारतात आणि 30% भारताच्या बाहेर होती. यावर्षी ही जवळपास 90%-10% असेल. आम्ही भारतात विशाल रँप-अप पहात आहोत.

एचसीएलने 31 मार्च, 2022 ला समाप्त होणार्‍या आर्थिक वर्षात भारतात 15,000 फ्रेशर्स आणि 1,500-2,000 लोकांना नोकरीवर ठेवण्याची योजना बनवली आहे. सक्सेना फायनान्शियल ग्रुप (एसएफजी) च्या जेम्स फ्रीडमॅन यांनी उल्लेख केला आहे की, मागणी सामान्यपणे मूलभूत पायाशी संबंधित आहे. त्यांनी म्हटले की, जिथे मोठे सौदे होतात, तिथे भारताचा माईंडशेयर पुन्हा एकदा वाढत आहे.

इन्फोसिसने जर्मन ऑटोमोटिव्ह प्रमुख डेमलरशी इतिहासातील आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा जिंकला आहे. सूत्रांनी सांगितले की, याचा अंदाज 3.2 बिलियन डॉलर आहे. टीसीएसने प्रूडेंशियल फायनान्शियलशी एक मोठा सौदा जिंकला. तर विप्रोने जर्मन रिटेलर मेट्रोसोबत एक मोठा करार केला.

विप्रोला आशा आहे की, पुढील काही महिन्यात आयटी सेक्टरमध्ये टॅलेंट वॉर खुले होईल, कारण कंपन्यांनी मागील तीन तिमाहीत हायरिंग वाढवले आहे.

लंडन येथील आयटी सल्लागार ओमडियाच्या प्रमुख विश्लेषक हंसा अयंगर यांनी म्हटले की, व्यवसाय डिजिटल अजेंडा आणि गुंतवणुकीत तेजी आणत आहेत, कारण जग एक महामारी रिकव्हरी पहात आहे. कॅम्पस भरती डिजिटल पोर्टफोलियो आणि वितरण वाढवण्यासाठी चांगला मार्ग आहे.