Mirzapur Web series : तिसऱ्या सीजनला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओचा ‘ग्रीन सिग्नल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) ही वेब सीरिज खूपच गाजली आहे. अलीकडेच या सीरिजचा दुसरा सीजनही (Mirzapur 2) रिलीज झाला आहे ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याच्या दुसऱ्या सीजनचं यश पाहून आता ॲमेझॉन प्राईम व्हिडीओनं याच्या तिसऱ्या सीजनला ग्रीन सिग्नल दिला आहे.

खास बात अशी की, जगभरातून या सीरिजला प्रतिसाद मिळत आहे. चाहते या सीरिजचं भरभरून कौतुक करत आहेत. यातील कलाकार प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडण्यात यशस्वी झाले आहेत.

एक्सेल एंटरटेन्मेंटचे (Excel Entertainment) निर्माते रितेश सिधवानी (Ritesh Sidhwani) म्हणाले की, मिर्झापूरनं 2 दमदार सीजनमध्ये मनोरंजनाच्या जगात खळबळ माजवली आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओशिवाय हे घडवणं अशक्य होतं. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम पाहून आम्ही खरंच धन्य झालो आहोत.

मिर्झापूर या वेब सीरिजबद्दल बोलायचं झालं तर गुरमीत सिंह आणि मिहिर देसाई यांनी या सीरिजचं डायरेक्शन केलं आहे. पहिल्या सीजनप्रमाणेच याच्या दुसऱ्या सीजनलाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या सीरिजमधील मुन्ना त्रिपाठी, गुड्डू भैया, कालीन भैया आणि गोलू असे पात्र खूप गाजले आहेत.