मोदी सरकारची ‘भन्‍नाट’ योजना : ‘हे’ केल्यास निवृत्‍तीनंतर दरमहा ६० हजार मिळतील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार सत्तेत आल्यापासून नागरिकांसाठी रोज नवनवीन योजना आणत असते. अशीच एक भन्नाट योजना मोदी सरकारने आणली आहे. ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला ६० हजार रुपये पेन्शन मिळू शकते. येणाऱ्या काळात ही योजना आर्थिक स्थीती बदलू शकते. त्यामुळे सरकारद्वारे चालवली जाणारी ही नॅशनल पेन्शन सिस्टिम नागरिकांसाठी उत्तम पर्याय बनू शकतो.

या योजनेअंतर्गत दर महिन्याला ५ हजार रुपये भरायचे निवृत्ती नंतर महिन्याला ६० हजार रुपये पेन्शन मिळेल. ही सुविधा पुर्वी फक्त १८-६० वर्षातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच होती. मात्र आता ती सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. तशी ही सुविधा २००९ मध्येच प्रायवेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्यात आली होती. यात २५ ते ६० वर्षांपर्यंत म्हणजे ३५ वर्ष दर महिन्याला ५ हजार रुपये या योजनेत भरायचे. जे सर्व मिळून २१ लाख रुपये होतात. NPS मध्ये एकूण गुंतवणूकीवर अंदाजे ८ टक्के रक्कम मिळणार आहे. तर एकूण निधी १.१५ कोटी होते. आपण त्यातील अ‍ॅन्युइटीच्या ८० टक्के रक्कम खरेदी केल्यास, मूल्य सुमारे ९३ लाख रुपये असेल. जर अ‍ॅन्युइटी दर ८ टक्के असेल तर ६० वर्षांनंतर प्रत्येक महिन्यात सुमारे ६१ हजार रुपये पेंशन असेल. याशिवाय २३ लाख रुपयांचा स्वतंत्र निधी समाविष्ट केला जाईल.

ही सुविधा घेण्यासाठी काय करावे लागेल. एनपीएसमध्ये या योजनेसाठी सरकारने सरकारी आणि खाजगी बँकांना सादरीकरण केले आहे. आपण जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन एखादे खाते उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला बर्थ प्रमाणपत्र, १० वी पद, पत्ता पुरावा आणि आधार कार्ड आवश्यक आहे. नोंदणी फॉर्म बँकेकडून मिळतो. या योजने अंतर्गत दोन प्रकारची खाती उघडली जाऊ शकतात. टियर-१ आणि टियर-२ खाते आहेत. टियर-१ खाते खोलने आवश्यक आहे. तर टियर १ खाते असल्यास टियर २ खाते कोणीही सुरु करू शकते. नियमानुसार टियर १ खात्यातून ६० वर्ष वय पूर्ण होईपर्यंत पैसे काढता येणार नाहीत. तर टियर २ खात्यातून पैसे जेव्हा पाहिजे तेव्हा टाकू आणि काढू शकतो.

आरोग्यविषयक वृत्त –

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या